शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

US Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:19 AM

US Open 2018 : न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

न्यूयॉर्क : नोव्हाक जोकोव्हिचने जुआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करीत तिसऱ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद पटकावले. यासह त्याने दिग्गज खेळाडू पीट सॅम्प्रासच्या १४ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या कामगिरीची बरोबरी केली.आठव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत खेळणाºया जोकोव्हिचने ६-३, ७-६(५), ६-३ ने सरशी साधली. यापूर्वी जोकोव्हिचने येथे २०११ व २०१५ मध्ये जेतेपद पटकावले आहे. आता तो ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत राफेल नदालपासून तीन आणि रॉजर फेडररपासून सहा जेतेपद दूर आहे. सर्बियाचा हा खेळाडू गेल्या वर्षी कोपराच्या दुखापतीमुळे येथे खेळू शकला नव्हता.जागतिक क्रमवारीतील माजी तिसºया क्रमांकाचा खेळाडू डेल पोत्रो ९ वर्षांपूर्वी यूएस ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर दुसºयांदा ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. अर्जेंटिनाच्या पोर्त्रोविरुद्ध जोकोव्हिचचा हा १५ आणि ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील पाचवा विजय आहे. जोकोव्हिचने या विजयासह गेल्या ५५ पैकी ५० ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत ‘बिग फोर’ म्हणजेच फेडरर, नदाल, जोकोव्हिच किंवा अँडी मरे यांनी विजेतेपद पटकावले आहे.मुसळधार पावसामुळे आर्थर अ‍ॅश स्टेडियमचे छत बंद करण्यात आले होते. जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये ५-३ ने आघाडी घेतली. त्याने २२ शॉटच्या रॅलीनंतर पहिला सेट जिंकला. डेल पोत्रोने दुसºया सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. तिसºया सेटमध्ये डेल पोत्रो थकलेला दिसला आणि जोकोव्हिचने सेटसह सामनाही जिंकला.>फेडरर, नदालचा आभारी आहे : जोकोव्हिचअमेरिकन ओपनच्या जेतेपदासह पीट सॅम्प्रासच्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची बरोबरी करणाºया नोव्हाक जोकोव्हिचने रॉजर फेडरर व राफेल नदाल यांनी मला येथेपर्यंत पोहचविले असल्याचे म्हटले. जोकोव्हिच म्हणाला,‘पीट सँप्रास महान खेळाडूंपैकी एक आहे. तो माझा बालपणीचा ‘हीरो’ आहे. मी त्याला बघून टेनिस खेळणे शिकलो. त्याच्या एवढे ग्रँडस्लॅम जिंकणे माझ्यासाठी विशेष आहे. कदाचित १० वर्षांपूर्वी मी नदाल व फेडरर यांच्या युगात असल्यामुळे खूश नसल्याचे म्हटले असते, पण आता याचा आनंद आहे.’

 

 

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिसUS Open 2018अमेरिकन ओपन टेनिस