Tennis Star Sania Mirza, Indian women's team ODI captain Mithali Raj joins fight against Corona Virus svg | Corona Virus : सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात

Corona Virus : सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू व्यक्तिंसाठी टेनिसपटू सानिया मिर्झानं एक चळवळ उभी केली होती. त्यातून तिनं एका आठवड्यात 1.25 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या निधीतून जवळपास 1 लाख लोकांना मदत करता येणार आहे. याशिवाय भारतीय महिला वन डे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनंही 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

''गेल्या आठवड्यात आम्ही गरजूंना मदत करण्यासाठी एक चळवळ उभी केली होती. यातून हजारो कुटुंबांना अन्न पुरवण्यात येणार आहे आणि त्या चळवळीला योग्य प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1.25 कोटी रुपये जमा झाले आहेत,'' अशी माहिती सानिया मिर्झानं दिली.


मिताली राजनंही पंतप्रधान आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 5 लाख असे एकूण 10 लाखांची मदत केली आहे. 

क्रिकेटपटूंव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातील अन्य खेळाडूही मदतीसाठी पुढे आले आहेत.  बॉक्सर मेरी कोमनं एका महिन्याचा पगार व 1 कोटी, बॅटमिंडनपटू पी व्ही सिंधूनं 10 लाख आणि कुस्तीपटू बजरंग पुनियानं सहा महिन्याचा पगार दिला आहे.  गोल्डन गर्ल हिमा दासनंही एका महिन्याचा पगार दिला आहे. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

१ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच

Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!

डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज

रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

 महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान

Web Title: Tennis Star Sania Mirza, Indian women's team ODI captain Mithali Raj joins fight against Corona Virus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.