Corona Virus : Rohit Sharma donate 80 lakhs to fight against Corona Virus svg | Big Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

Big Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी धावला आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी रोहितनं चार संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. त्यानं सामाजिक भान राखताना ही मदत केली. रोहितनं केलेली मदत ही सचिन, रैना, रहाणे यांच्यापेक्षा अधिक आहे.

सचिन तेंडुलकरने  पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार  लावला आहे. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं 52 लाखांची मदत केली आहे. यापैकी  31 लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जाणार आहेत.

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाखांची मदत केली आहे.  भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं त्याच्या फंडातून 1 कोटींची मदत दिल्ली सरकारला केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं 50 लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या संलग्न संघटनांसह मिळून 51 कोटींची मदत केली. मुंबई क्रिकेट असोसिएशननं राज्य सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय बीसीसीआयच्या फंडातही 50 लाख दिले.

रोहितनं पंतप्रधान सहाय्यता निधीत 45 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले. याशिवाय Zomato Feeding India  आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs. संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली.


क्रिकेटपटूंव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातील अन्य खेळाडूही मदतीला पुढे आले आहेत. 16 वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोषऩं 1 लाखांची मदत केली. इरफान व युसुफ पठाणनं 4000 मास्क दिले. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजनं 10 लाखांची मदत केली. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं उभ्या केलेल्या चळवळीतून 1.25 कोटी जमा झाले आहेत. बॉक्सर मेरी कोमनं एका महिन्याचा पगार व 1 कोटी, बॅटमिंडनपटू पी व्ही सिंधूनं 10 लाख आणि कुस्तीपटू बजरंग पुनियानं सहा महिन्याचा पगार दिला आहे. 

 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus : Rohit Sharma donate 80 lakhs to fight against Corona Virus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.