टेनिस कोर्टवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 17:49 IST2018-08-08T17:49:17+5:302018-08-08T17:49:59+5:30

सध्याच्या घडीला भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही गर्भवती आहे. त्यामुळे टेनिसच्या कोर्टवर कशी उतरू शकते, हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

Tennis star Sania Mirza enter's in playing court | टेनिस कोर्टवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा हा फोटो

टेनिस कोर्टवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा हा फोटो

ठळक मुद्देसानियानेच तिचा टेनिस कोर्टवरचा एक फोटो आपल्या ट्विटवर हँडलवर पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली : हे शिर्षक ऐकल्यावर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. कारण सध्याच्या घडीला भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही गर्भवती आहे. त्यामुळे टेनिसच्या कोर्टवर कशी उतरू शकते, हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. पण सानियानेच तिचा टेनिस कोर्टवरचा एक फोटो आपल्या ट्विटवर हँडलवर पोस्ट केला आहे.

सानियाने आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली सानियाने काही ओळी लिहिल्या आहे. सानियाने लिहिले आहे की, " टेनिस कोर्टपासून खेळाडू काही अवधीसाठी दूर होऊ शकतो, पण खेळाडूच्या आयुष्यातून टेनिस कधीही दूर होऊ शकत नाही. "

सानियाने पोस्ट केलेला टेनिस कोर्टवरचा फोटो पाहा


Web Title: Tennis star Sania Mirza enter's in playing court