सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:21 PM2020-05-13T13:21:08+5:302020-05-13T13:22:16+5:30

लॉकडाऊनच्या या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. 

Sania Mirza's trousers? TikTok video featuring shopkeeper and customer chuckles Indian tennis star svg | सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट

सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट

googlenewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील रुग्णांचा आकडा 74480 इतका झाला आहे. त्यापैकी 24453 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 2415 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याचे संकेत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लॉकडाऊनच्या या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. 

बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव 

कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तर रोज टिक टॉकवर नवीन व्हिडीओ अपलोड करताना पाहायला मिळत आहे. पण, सध्या सोशल मीडियावर Sania Mirza's trousers? असा एक टिक टॉक व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानियानंही हा व्हिडीओ शेअर केला आणि तिला तो पाहून हसू आवरले नाही. या व्हिडीओत एक ग्राहक दुकानदाराकडे सामानाची यादी देतो. त्यावर लिहिलेलं सामानांची नावं वाचताना दुकानदार सानिया मिर्झा ट्राऊझर असे वाचतो.... थोडा विचार केल्यानंतर त्याला हे समजतं की सानिया मिर्झा ट्राऊझर नाही, तर त्या ग्राहकाला सॅनिटायझर हवं असतं.  

पाहा व्हिडीओ... 


 
दरम्यान सानियानं सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तिला एकूण १६९८५ पैकी १० हजारापेक्षा अधिक मते मिळाली. हा पुरस्कार चाहत्यांच्या मतांच्या आधारावर देण्यात येतो. यासाठी १ मे पासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण ६० टक्के मते मिळाली. फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरणे अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय टेनिस महासंघाने व्यक्त केली. या पुरस्कारासाठी २ हजार डॉलर मिळतात. सानियाने ही रक्कम तेलंगण मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दान दिली.

आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?

'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक

Web Title: Sania Mirza's trousers? TikTok video featuring shopkeeper and customer chuckles Indian tennis star svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.