Yuvraj Singh question Vikram Rathore's credentials as batting coach svg | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?

भारताचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगनं मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यानं टीम इंडियाच्या फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय त्यानं अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

युवीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवीनं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची फिरकी घेतली. ''सध्याचे खेळाडू जास्त बोलत नाही आणि सल्लाही घेत नाहीत. रवी शास्त्री खेळाडूंना मार्गदर्शन करतात की नाही, हे मला माहित नाही, परंतु त्यांच्याकडे अन्य जबाबदारी असेल. मैदानावर जा आणि तुझा खेळ कर, असं तुम्ही प्रत्येकाला सांगू शकत नाही. असा दृष्टीकोन सेहवागसारख्या खेळाडूसाठी योग्य आहे, परंतु पुजाराच्या तो कामी येणार नाही. प्रशिक्षकांच्या स्टाफनं याचा विचार करायला हवा.''


युवीनं राठोड यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय बांगर यांच्या जागी राठोड यांची फलंदाजी  प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. युवी म्हणाला,''राठोड माझा मित्र आहे. ट्वेंटी-20 जनरेशनच्या खेळाडूंना तो मदत करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? त्या लेव्हलचं क्रिकेट तो खेळला आहे का?'' 2007 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य असलेल्या युवीनं इंस्टाग्राम चॅटवर हे प्रश्न उपस्थित केले. राठोड यांनी 1996-97 या कालावधीत सहा कसोटी आणि सात वन डे सामने खेळले.


''किंग्स इलेव्हन पंजाब संघापासून मला दूर पळायचे होते. संघाचे व्यवस्थापन मला पसंत करत नव्हते. मी त्यांना काही करायला सांगितले, तर ते कारचेच नाही. मला पंजाब आवडते, परंतु फ्रँचायझीचा कारभार मला आवडला नाही.'' 

'आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yuvraj Singh question Vikram Rathore's credentials as batting coach svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.