Rafael Nadal calls on Spain's athletes to raise 11 million euros to fight coronavirus svg | Corona Virus : देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प!

Corona Virus : देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प!

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान माजवलं आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाख 14,404 इतका झाला आहे. मृतांचा आकडा वाढून 28,242 इतका झाला आहे. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. आतापर्यंत 1 लाख 37,329 लोकं बरी झाली आहेत. असे असले तरी हा व्हायरस आटोक्यात येताना दिसत नाही. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. इटली ( 86 हजार), चीन ( 81 हजार) आणि स्पेन ( 72 हजार) या देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. स्पेनमधील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा हा 5690 इतका झाला आहे आणि त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेवर आधिराज्य गाजवणारा 'लाल बादशाह' राफेल नदाल पुढे आला आहे.

राफेल नदालनं स्पेन सरकारला मदत करण्यासाठी देशातील सर्व खेळाडूंना निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं एक- दोन नव्हे तर सरकारच्या मदतीसाठी तब्बल 90 कोटी जमा करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्याच्या या आवाहनाला देशातील क्रीडापटूंचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. नदालनं ही संकल्पना अस्तित्वात आणण्यापूर्वी NBA स्टार पाऊ गॅसोल याच्याशी चर्चा केली आणि या दोघांनी पुढाकार घेत सरकारला मदत करण्याचे ठरवले.

नदाल म्हणाला,''आम्ही खेळाडू यशस्वी आहोत कारण तुम्ही सर्व आम्हाला पाठींबा देता आणि आता तुम्हाला आमच्या पाठिंब्याची गरज आहे. स्पेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आम्ही सुधारू शकत नाही, परंतु आम्ही गरजूंसाठी मदत नक्की उभ करू शकतो. त्यासाठी मी स्पेनमधील सर्व खेळाडूंना मदत करण्याचं आवाहन करत आहे. येथील 1.35 मिलियन लोकांच्या मदतीसाठी मी 90 कोटी ( 11 मिलियन) निधी गोळा करण्याचा संकल्प केला आहे. मला स्पेनमधील सर्व खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. पाऊ आणि मी माझं योगदान दिलं आहे. आता तुमची वेळ आहे.''

नदालपूर्वी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि त्याच्या पत्नीनं स्वित्झर्लंड सरकारला 8 कोटी, नोव्हाक जोकोव्हिचनं सर्बिया सरकारला 8 कोटींचा निधी दिला. तत्पूर्वी, लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गॉर्डीओला यांनीही प्रत्येकी 8 कोटी निधी दिला, तसेच ख्रिस्तियानो रोनाल्डोनं पोर्तुगालच्या हॉस्पिटलला मदत केली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका

Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!

Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती

MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा 

Video : घरी बसून 'हिटमॅन'ला काय काय करावं लागतंय? इंग्लंडच्या खेळाडूला सांगितली व्यथा

लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड 

Web Title: Rafael Nadal calls on Spain's athletes to raise 11 million euros to fight coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.