शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:09 AM

जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 77,662 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 लाख 90,681 जणं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यात कोरोना संदर्भात येणारी कोणतीही माहिती खात्री न करताच फॉरवर्ड केली जात आहे. त्यामुळे ही भीती अजूनच वाढत चालली आहे. विविध देशांनी अशा चुकीच्या माहिती पसरवण्यांवर कठोर कारवाईसाठीचा कायदा केला आहे. पण, तरीही अशा माहिती पसरत आहेच. सामान्य सोडा आता स्टार खेळाडूच्या पत्नीनंच कोरोना व्हायरससंदर्भात चुकीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. 

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची पत्नी जेलेनानं कोरोना संदर्भात चुकीची माहिती देणारा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला. 33 वर्षीय जेलेनानं शेअर केलेल्या 10 मिनिटांच्या व्हिडीओत कोरोना व्हायरसचा संदर्भ 5G शी जोडला गेला आहे. तिची ही पोस्ट बॉक्सर आमीर खान, लीन रायन, जेसन गार्डिनर आणि कॅलम बेस्ट आदी सेलिब्रेटिंनीही शेअर केली. जेलेनाचे इंस्टाग्रामवर 5 लाख फॉलोअर्स आहेत.

तिनं हा व्हिडीओ शेअर करताना पोस्ट लिहिली की,''कोरोना व्हायरस संदर्भात तुमचं मत काय? कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. त्याची खात्री करण्यास कोणाकडे वेळ  नाही, तुम्ही हा व्हिडीओ तपासा आणि मला तुमचं मत कळवा.''

Independent Fact Checkers ने त्वरीत हा व्हिडीओ डिलिट केला. आफ्रिकेला कोरोना व्हायरसचा फटका बसला नाही, कारण तेथे 5G नाही, असा दावा काही दिवसांपूर्वी केला गेला होता.  

 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच