शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

Novak Djokovic, WIMBLEDON Final 2022 : नोव्हाक जोकोव्हिचचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद, फायनलमध्ये 'बॅड बॉय' निक किर्गिओसला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 9:46 PM

Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला.

Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : राफेल नदालने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली अन् ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची लॉटरी लागली. नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला. नोव्हाकने सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावले. त्याने यापूर्वी २०११, २०१४,  २०१५, २०१८, २०१९ व २०२१ मध्ये येथे जेतेपदाचा चषक उंचावला होता. हे त्याचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले आणि त्याने रॉजर फेडररला ( २०) मागे टाकले. राफेल नदाल सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅमसह आघाडीवर आहे.   निकने पहिला सेट २९ मिनिटांत ६-४ असा नावावर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, दुसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने जबरदस्त कमबॅक करताना सलग सहा गुणांची कमाई केली. मागील तीन सामन्यांत नोव्हाकने प्रथमच निकची सर्व्हिस ब्रेक केली. नोव्हाकने दुसरा सेट ६-३ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला.  नोव्हाकने या सेटमध्ये चार ब्रेक पॉईंट वाचवले.   तिसऱ्या सेटमध्ये निककडून चुका झाल्या आणि नैराश्येत तो प्रेक्षकांमधील एका व्यक्तिशी हुज्जत घालताना दिसला. निकची ही जुनीच सवय होती.  त्याने प्रेक्षकांमधील दारूड्या व्यक्तिला बाहेर पाठवण्याची मागणी चेअर पंचाकडे केली. पण, त्याचा फार काही उपयोग झाला नाही नोव्हाकने  तिसरा सेट ६-४ असा घेत २-१ अशी आघाडी घेतली. २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर नोव्हाक विम्बल्डनमध्ये एकदाच पराभूत झाला आहे आणि तोही २००६मध्ये मारियो एन्सिककडून. २९ मॅच त्याने जिंकल्या आहेत.  

चौथ्या सेटमध्ये कमालीचा थरार पाहायला मिळाला. निकने १-२ अशा पिछाडीवरून त्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी मिळवली. निकने ६-५ अशा आघाडीसह स्वतःची बाजू थोडी वरचढ केली. नोव्हाकने ६-६ अशी बरोबरी मिळवताना टाय ब्रेकमध्ये हा सेट नेला. निकने या टाय ब्रेकरमध्ये दोन मॅच पॉईंट वाचवले. नोव्हाकने पण मॅच पॉईंट घेतला अन् ४-६, ६-३, ६-४, ७-६ अशा फरकाने जेतेपद नावावर केले.

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस