जोकोवीच 'टॉप १०' मधील सर्वांना भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 12:19 IST2018-11-16T12:00:43+5:302018-11-16T12:19:32+5:30

यंदा भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम आपले स्थान निश्चित केले.

Novak Djokovic is a Serbian professional tennis player who is currently ranked No. 1 in ATP Cup | जोकोवीच 'टॉप १०' मधील सर्वांना भारी

जोकोवीच 'टॉप १०' मधील सर्वांना भारी

ठळक मुद्दे सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम आपले स्थान निश्चित केले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेववरील सरळ विजयासह त्याने ही आगेकूच केली आणि त्यादरम्यान एक अनोखा विक्रम नोंदवला. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत सध्या टॉप टेनमध्ये असलेल्या सर्व खेळाडूंवर आता त्याच्याकडे विजयी आघाडी आहे.

ललित झांबरे

यंदा भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम आपले स्थान निश्चित केले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेववरील सरळ विजयासह त्याने ही आगेकूच केली आणि त्यादरम्यान एक अनोखा विक्रम नोंदवला. 

टेनिसच्या जागतिक क्रमवारीत सध्या टॉप टेनमध्ये असलेल्या सर्व खेळाडूंवर आता त्याच्याकडे विजयी आघाडी आहे. यासह आपण खऱ्याअर्थाने नंबर वन असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. 

उदाहरणार्थ - झ्वेरेवविरुध्दच्या तीन लढतीत आता जोकोवीच दोन विजय आणि एक पराभव असा आघाडीवर आहे. 

 

जोकोची ही विक्रमी कामगिरी पुढीलप्रमाणे- 

क्रम           खेळाडू           जोकोचे विजय-पराभव

२           राफेल नदाल           २७-२५
३           रॉजर फेडरर           २५-२२
४         युआन डेल पौत्रो        १५- ०४
५       अलेक्झांडर झ्वेरेव      ०२-०१
६        केव्हिन अँडरसन       ०७-०१
७         मारिन सिलिक          १६-०२
८         डॉमिनिक थीएम        ०५-०२
९         केई निशीकोरी          १५-०२
१०          जॉन इस्नर              ०९-०२

Web Title: Novak Djokovic is a Serbian professional tennis player who is currently ranked No. 1 in ATP Cup