‘Joko’ is no bigger than the rule, the blow of violating the protocol | ‘जोको’ नियमापेक्षा मोठा नाही, प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका

‘जोको’ नियमापेक्षा मोठा नाही, प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका

-  अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

नोव्हाक जोकोविचसाठी हे वर्ष न विसरण्यासारखे ठरले आहे. त्याने वर्षाच्या मध्ये आॅड्रिया टूरचे आयोजन केले होते. पण कोविड १९ चा प्रसाररोखण्यासाठीच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका त्याला बसला. चारखेळाडूंसह जोकोविच स्वत: पॉझिटिव्ह होता. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोविच याने समांतर टेनिसपटूंची संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही. गेल्या आठवड्यात यूएस ओपनमधून तो बाहेर पडला. त्यामुळे त्याची १८ग्रॅण्डस्लॅम मिळवण्याची शक्यता संपली. नियम मोडल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. जोकोविचने निराशेने चेंडू आदळला. नंतर त्याने त्याच्या मागे असलेल्या लाईन जजला धडक दिली. त्यात ती खाली पडली.
जोकोने आणखी एक ग्रॅण्डस्लॅम जिंकली असती तर तो राफेल नदाल (१९) आणि रॉजर फेडरर(२०) यांच्या जवळ जाऊ शकला असता. नदाल कोविडच्या भीतीने तर फेडरर दुखापतीतून सावरत असल्याने खेळत नाही. खेळ हा अनिश्चिततेचा आहे. मात्र प्रमुख प्रतिस्पर्धी नसल्याने जोकोविचला विजयाचा मार्ग तसा सोपा होता. पण एका घटनेने तो मागे पडला. त्याची चूक त्याच्या लक्षात येताच लाईन जजची माफीही मागितली तिच्या तब्येतीची चौकशी केली. पण नुकसान झाले होते. काही मिनिटातच हा निर्णय घेण्यात आला होता. जोकोला पराभव मान्य करावा लागला. यूएस. ओपनचे रेफ्री सोरेन फ्रेमेल यांनी कठोर शिक्षा का केलीहे स्पष्ट केले. बॉल चुकीच्या पद्धतीने फेकला. तो सरळ लाईन पंचच्या गळ्याला लागला. आणि तिला दुखापत झाली. त्यामुळे ही कारवाई करावी लागली. त्याच्या विरुद्ध एवढी मोठी कारवाई न्याय्य होती का? एटीपी आणि यूएस ओपनचे अधिकारी हे श्रेयाला पात्र आहेत. कोविड १९ चा खेळाला मोठा फटका बसला आहे. फेडरर आणि नदालच्या अनुपस्थितीत संभाव्य विजेत्या खेळाडूवर अशी कारवाई करणे सोपे नव्हते.

- या घटनेमुळे टेनिस विश्व विचलित झाले आहे. पण अनेकांना ही शिक्षा योग्य वाटते. माझा विश्वास आहे ही त्याच्याविरोधातील कारवाई न्याय्य नाही तर आवश्यकही होती. क्रीडा प्रकारातील नियमांना सर्वोपरी मानले जायला हवे, यातून एक चांगला संदेश जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत.

Web Title: ‘Joko’ is no bigger than the rule, the blow of violating the protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.