आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताचे उन्नत, विश्वजीत चमकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 14:31 IST2023-08-26T14:31:13+5:302023-08-26T14:31:51+5:30
पटाया (थायलँड )येथे १८-२२ ऑगस्ट ला पार पडलेल्या ITF पटाया ओपन मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे यांनी चांगली कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताचे उन्नत, विश्वजीत चमकले
पटाया (थायलँड )येथे १८-२२ ऑगस्ट ला पार पडलेल्या ITF पटाया ओपन मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा ह्यांचा २-६ ६-४ १०-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका ह्या जोडी कडून ६-२ ६-० असा पराभव स्वीकारावा लागला.
मिश्र दुहेरी मधे भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण ह्या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो ह्यांचा ४-६ ६-२ ११-९ असा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत गाठली जिथे त्याना थायलँडच्या जोडी करुन पराभव स्वीकारावा लागला.
ह्या स्पर्धेमधे वीस हून अधिक देश सहभागी होते. ऑलिंपिक बीच गेममध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी उन्नत व विश्वजीत सांगळे सहभागी होणार होते पण या स्पर्धांचे आयोजन ऐनवेळी रद्द झाले. पण पुढील आवृत्तीसाठी दोन्ही खेळाडूंची खेळातली कामगिरी यशस्वी वाटचालीसाठी सुरू आहे. भारताच्या ह्या जोडीच्या स्पर्धांमधील प्रदर्शनामुळे भारताची बीच टेनिस या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा होणार हे निश्चित आहे.