Elena Rybakina Maiden AUS Open Title : नंबर वन सबालेंकाला पराभवाचा धक्का; एलिना रयबाकिना बनली नवी सम्राज्ञी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:12 IST2026-01-31T17:10:21+5:302026-01-31T17:12:58+5:30

रयबाकिनाचा हा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन किताब असून तिच्या कारकिर्दीतील दुसरा ग्रँड स्लॅम विजय आहे. दुसरीकडे, सबालेंकासाठी हा सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यातील पराभव ठरला आहे.

Elena Rybakina Maiden AUS Open Title: Number one Sabalenka suffers defeat; Elena Rybakina becomes the new empress | Elena Rybakina Maiden AUS Open Title : नंबर वन सबालेंकाला पराभवाचा धक्का; एलिना रयबाकिना बनली नवी सम्राज्ञी

Elena Rybakina Maiden AUS Open Title : नंबर वन सबालेंकाला पराभवाचा धक्का; एलिना रयबाकिना बनली नवी सम्राज्ञी

Elena Rybakina Maiden AUS Open Title : जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या एलिना रयबाकिनाने अंतिम सेटमध्ये अफलातून पुनरागमन करत बेलारुसच्या अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाला दोनदा ब्रेक देत ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.  रयबाकिनाने सामन्याच्या पहिल्याच गेममध्ये सबालेंकाची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-४ ने जिंकला. त्यानंतर सबालेंकाने जोरदार प्रत्युत्तर देत दुसरा सेट ६-४ असा आपल्या नावावर केला आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेतली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मात्र, यानंतर रयबाकिनाने सलग दोनदा सबालेंकाची सर्व्हिस मोडत सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली आणि तिसरा सेटही ६-४ ने जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. रयबाकिनाचा हा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन किताब असून तिच्या कारकिर्दीतील दुसरा ग्रँड स्लॅम विजय आहे. दुसरीकडे, सबालेंकासाठी हा सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यातील पराभव ठरला आहे.

Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा

Web Title : रायबाकिना ने सबालेंका को हराकर जीता ऑस्ट्रेलियन ओपन खिताब

Web Summary : एलेना रायबाकिना ने शानदार प्रदर्शन करते हुए आर्यना सबालेंका को ऑस्ट्रेलियन ओपन के फाइनल में हराया। रायबाकिना ने पहला सेट हारने के बाद शानदार वापसी की और अपना पहला ऑस्ट्रेलियन ओपन खिताब और दूसरा ग्रैंड स्लैम जीता। सबालेंका को लगातार दूसरे साल फाइनल में हार का सामना करना पड़ा।

Web Title : Rybakina Stuns Sabalenka for Maiden Australian Open Title

Web Summary : Elena Rybakina defeated Aryna Sabalenka in a thrilling Australian Open final. Rybakina recovered from a set down and a 3-0 deficit in the final set to claim her first Australian Open title and second Grand Slam victory. Sabalenka suffered her second consecutive final defeat.