शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:58 IST

Djokovic's historic 400th win: टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्याचा धडाका कायम ठेवत दिग्गज नोव्हाक जोकोविचने शनिवारी ग्रँड स्लॅममधील ४०० वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०२ वा विजय नोंदवला. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झँड्सचल्पचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला.

मेलबर्न - टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्याचा धडाका कायम ठेवत दिग्गज नोव्हाक जोकोविचने शनिवारी ग्रँड स्लॅममधील ४०० वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०२ वा विजय नोंदवला. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झँड्सचल्पचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये ४०० विजय मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

या विजयामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याचे जय-पराजयाचे रेकॉर्ड १०२-१० असे झाले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत त्याने रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील विक्रमाशी बरोबरी केली आहे. जोकोविचने आतापर्यंत १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हासुद्धा एक विक्रम आहे. ३८ वर्षीय जोकोविच आपल्या कारकिर्दीतील २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहे. यात तो यशस्वी झाल्यास, तो सर्वकालीन सर्वात यशस्वी टेनिसपटू बनेल.

तीन वेगवेगळ्या कोर्टवर १०० विजयांचा विक्रमजागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने ग्रँड स्लॅम इतिहासात तीन वेगवेगळ्या कोर्टवर १०० किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याचा विक्रमही नोंदवला आहे.

विम्बलडन (ग्रास कोर्ट) : १०२ विजयफ्रेंच ओपन (क्ले कोर्ट) : १०१ विजयऑस्ट्रेलियन ओपन (हार्ड कोर्ट) : १०२ विजय

बालाजी, ओबरलीट्नरचे आव्हान संपुष्टातभारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार नील ओबरलीट्नर यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्यांना अल साल्वाडोरचा मार्सेलो अरेवालो आणि क्रोएशियाचा मेट पाविच या जोडीकडून ५-७, १-६ असा पराभव स्वीकारावा लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Djokovic Achieves Historic 400th Win, Equals Federer's Australian Open Record

Web Summary : Novak Djokovic marked his 400th Grand Slam win, equaling Federer's Australian Open record. He defeated Botik van de Zandschulp. He aims for his 25th Grand Slam title. Balaji and Oberlaitner are out of the doubles.
टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस