जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:58 IST2026-01-25T09:55:34+5:302026-01-25T09:58:01+5:30

Djokovic's historic 400th win: टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्याचा धडाका कायम ठेवत दिग्गज नोव्हाक जोकोविचने शनिवारी ग्रँड स्लॅममधील ४०० वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०२ वा विजय नोंदवला. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झँड्सचल्पचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला.

Djokovic's historic 400th win equals Federer's record at the Australian Open | जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

मेलबर्न - टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्याचा धडाका कायम ठेवत दिग्गज नोव्हाक जोकोविचने शनिवारी ग्रँड स्लॅममधील ४०० वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०२ वा विजय नोंदवला. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झँड्सचल्पचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये ४०० विजय मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

या विजयामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याचे जय-पराजयाचे रेकॉर्ड १०२-१० असे झाले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत त्याने रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील विक्रमाशी बरोबरी केली आहे. जोकोविचने आतापर्यंत १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हासुद्धा एक विक्रम आहे. ३८ वर्षीय जोकोविच आपल्या कारकिर्दीतील २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहे. यात तो यशस्वी झाल्यास, तो सर्वकालीन सर्वात यशस्वी टेनिसपटू बनेल.

तीन वेगवेगळ्या कोर्टवर १०० विजयांचा विक्रम
जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने ग्रँड स्लॅम इतिहासात तीन वेगवेगळ्या कोर्टवर १०० किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याचा विक्रमही नोंदवला आहे.

विम्बलडन (ग्रास कोर्ट) : १०२ विजय
फ्रेंच ओपन (क्ले कोर्ट) : १०१ विजय
ऑस्ट्रेलियन ओपन (हार्ड कोर्ट) : १०२ विजय

बालाजी, ओबरलीट्नरचे आव्हान संपुष्टात
भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार नील ओबरलीट्नर यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्यांना अल साल्वाडोरचा मार्सेलो अरेवालो आणि क्रोएशियाचा मेट पाविच या जोडीकडून ५-७, १-६ असा पराभव स्वीकारावा लागला.

Web Title : जोकोविच ने रचा इतिहास, 400वीं जीत के साथ फेडरर के रिकॉर्ड की बराबरी

Web Summary : नोवाक जोकोविच ने 400वीं ग्रैंड स्लैम जीत दर्ज कर फेडरर के ऑस्ट्रेलियन ओपन रिकॉर्ड की बराबरी की। उन्होंने बोटिक वैन डे ज़ैंडस्चुल्प को हराया। अब वह अपना 25वां ग्रैंड स्लैम खिताब जीतने का लक्ष्य रख रहे हैं। बालाजी और ओबरलिटनर युगल से बाहर हो गए हैं।

Web Title : Djokovic Achieves Historic 400th Win, Equals Federer's Australian Open Record

Web Summary : Novak Djokovic marked his 400th Grand Slam win, equaling Federer's Australian Open record. He defeated Botik van de Zandschulp. He aims for his 25th Grand Slam title. Balaji and Oberlaitner are out of the doubles.