शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

Coronavirus: उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:39 IST

CoronaVirus: क्रीडाविश्वात अनेक खेळाडूंनी आर्थिक मदत केलीय, तर अनेकांनी गरीब कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक देश कोरोना विषाणूला हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय.अत्यंत बेशिस्त, बेलगाम, आक्रस्ताळ्या वर्तनासाठी निक किर्गियोस कुप्रसिद्ध आहे.'नूडल्सचा बॉक्स असो, ब्रेड असो किंवा दूध; मी तुमच्या घरी पोहोचवेन', अशी पोस्ट निकनं केली आहे.

एखाद-दुसऱ्या देशातच नव्हे, तर अख्ख्या जगातच कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. 'कोव्हीड १९' च्या जगभरातील रुग्णांची संख्या १३ लाखांहून अधिक आहे आणि ७४ हजारपेक्षा अधिक जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश या विषाणूला हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय आणि या लढाईत प्रत्येक देशवासीय आपापलं योगदान देत आहे. भारतात जसे उद्योगपती, नेतेमंडळी, सेलिब्रिटी, खेळाडूंपासून जनसामान्यांपर्यंत सगळेच 'मिशन कोरोना'साठी सरसावलेत, तसंच चित्र जगभरात पाहायला मिळतंय. 

क्रीडाविश्वात अनेक खेळाडूंनी आर्थिक मदत केलीय, तर अनेकांनी गरीब कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे. या दानशूर, मोठ्या मनाच्या क्रीडापटूंमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा टेनिसस्टार निक किर्गियोसचं नावही जोडलं गेलंय. खरं तर, अत्यंत बेशिस्त, बेलगाम, आक्रस्ताळ्या वर्तनासाठी निक किर्गियोस कुप्रसिद्ध आहे. त्यानं अनेकदा आपल्या वागण्या-बोलण्यातून प्रतिस्पर्धी खेळाडूंचा अपमान केलाय, अनेकांना दुखावलं आहे. अर्थात, काही वेळा माफीही मागितलीय, पण त्याची ओळख 'बॅड बॉय' अशीच आहे. मात्र, कोरोना संकटात त्यानं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून त्याच्यातील 'गुड बॉय'चं दर्शन घडलंय.

पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात

हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन

युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत

ऑस्ट्रेलियात कोरोनाचे ५,८९५ रुग्ण असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक उद्योग, कारखाने, व्यवसाय बंद असल्यानं हातावर पोट असलेल्या कामगारांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. त्यांचं पोट भरण्यासाठी निक मैदानात उतरला आहे. 'कृपया रिकाम्या पोटी कुणीही झोपू नका. कुठलाही संकोच न करता, थेट मला मेसेज करा. माझ्याकडे जे आहे, ते तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंदच होईल. नूडल्सचा बॉक्स असो, ब्रेड असो किंवा दूध; मी तुमच्या घरी पोहोचवेन', अशी काळजाला भिडणारी पोस्ट निकनं केली आहे. ही पोस्ट तब्बल ९० हजारांहून अधिक जणांनी 'लाईक' केलीय.  

कोरोना Vs. जग... क्रीडापटूंचा मदतीचा हात

क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!

सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार

वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू

अमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी

देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प!

आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAustraliaआॅस्ट्रेलिया