Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत

युवीनं जेव्हा आफ्रिदीच्या समाजकार्याचं कौतुक केलं तेव्हा त्याचावर टीका झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:14 AM2020-04-06T10:14:21+5:302020-04-06T10:16:10+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : Yuvraj Singh donate 50 Lakhs to the PM Cares Funds svg | Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत

Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या समाजकार्याचे कौतुक केलं होतं. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानातही काही भागांत लॉकडाऊन केले गेले आहे. या निर्णयामुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आफ्रिदी आणि त्याची फाऊंडेशन कार्य करत आहेत. त्याच्या या समाजकार्याचे युवराजसह भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यांनी कौतुक केले होते. पण, त्यांची ही खिलाडूवृत्ती देशातील चाहत्यांना आवडली नाही आणि त्यांनी युवी व भज्जीला ट्रोल केले. या दोघांनी टीकाकारांना उत्तर दिले आणि आता युवीनं एक पाऊल पुढे टाकताना आर्थिक मदतही जाहीर केली.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत.

त्यामुळे युवीनं जेव्हा आफ्रिदीच्या समाजकार्याचं कौतुक केलं तेव्हा त्याचावर टीका झाली. युवीनं रविवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला आहे. युवीनं 50 लाखांचा निधी दान केल्याचे जाहीर केले. 


 

Web Title: Corona Virus : Yuvraj Singh donate 50 Lakhs to the PM Cares Funds svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.