शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

कॅनडाचा संघ अधिक मजबूत , महेश भूपती : २०१५ च्या चेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:55 AM

डेनिस शापोवालोवसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असलेला कॅनडा संघ २०१५मध्ये भारताचा प्लेआॅफमध्ये पराभव करणा-या चेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे, असे मत भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपती याने व्यक्त केले.

नवी दिल्ली : डेनिस शापोवालोवसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असलेला कॅनडा संघ २०१५मध्ये भारताचा प्लेआॅफमध्ये पराभव करणा-या चेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे, असे मत भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपती याने व्यक्त केले.भारतीय संघ एडमंटनमध्ये पोहोचण्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये एक आठवड्याच्या शिबिरात सहभागी झाला होता. भारतीय संघ एलिट विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्यासाठी चौथ्यांदा प्रयत्न करणार आहे.एशिया ओसियाना गटात वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये २०१४मध्ये सर्बिया, २०१५मध्ये चेक प्रजासत्ताक आणि २०१६मध्ये राफेल नदालच्या नेतृत्वाखालील स्पेनविरुद्ध पराभूत झालेला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या लढतीसाठी कॅनडाने यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारणारा जागतिक क्रमवारीत ५१व्या क्रमांकाचा खेळाडू शापोवालोव, वासेक पोसपिसिली (८२) यांच्याव्यतिरिक्त दुहेरीतील दिग्गज डॅनियल नेस्टर आणि ब्रायन इस्नर यांना संघात स्थान दिलेले आहे. शापोवालोवची गेल्या काही आठवड्यांतील कामगिरी शानदार आहे. यूएस ओपनमध्ये त्याने चौथ्या फेरीत धडक मारली होती. या १८ वर्षीय खेळाडूने माँट्रियल मास्टर्सच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. दरम्यान, त्याने नदालचाही पराभव केला होता. भारत दौºयावर आलेल्या चेक प्रजासत्ताक संघात जिसरी वेस्ली (त्या वेळी विश्व मानांकनात ४०व्या स्थानी आणि आता ५९व्या स्थानी) आणि लुकास रोसोल (त्या वेळी मानांकनात ८५व्या स्थानी) एकेरीचे प्रमुख खेळाडू होते. (वृत्तसंस्था)  युकीने सिटी ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या गेल मोनफिल्सचा पराभव केला होता, तर रामकुमारने अंताल्या ओपनमध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या डोमिनिक थीमविरुद्ध सरशी साधली होती.भूपती म्हणाला, ‘‘विजयामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. अव्वल १००मध्ये स्थान मिळविण्याची ही सुरुवात आहे. युकी व राम यांनी यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी केली. रोहन माँट्रियलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. युकी व राम यांची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. साकेतची कामगिरी सुधारत आहे.’’कॅनडाचा संघ चांगला आहे; पण त्यांच्याविरुद्ध खेळण्याचा अधिकार प्राप्त केल्यामुळे आम्ही येथे आहोत. भारत दौºयावर आलेल्या चेक प्रजासत्ताकाच्या संघाच्या तुलनेत कॅनडाचा संघ सरस आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. - महेश भूपतीभूपती म्हणाला, ‘‘न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील सरावामुळे भारताला इन्डोअर लढतीसाठी तयारी करण्याची चांगली संधी मिळाली. आठवडाभर संघाने येथे सराव केला. युकी भांबरी व रामकुमार रामनाथन यांनी अलीकडच्या कालावधीत त्यांच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.’’ 

टॅग्स :Sportsक्रीडा