शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ऑस्ट्रेलियन ओपन : रॉजर फेडरर, राफेल नदाल यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:45 IST

आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

ठळक मुद्देमहिलांमध्ये कर्बर, शारापोवा यांचा धडाकाअखेरचा सामना चांगल्या रीतीने संपला - मरेप्रजनेश गुणेश्वरन पहिल्याच फेरीत बाद

मेलबर्न : आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनेऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत फेडररने विजयी सुरुवात केली. स्पेनचा दिग्गज राफेल नदाल यानेही सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना सहज आगेकूच केली असून, ब्रिटनचा स्टार अँडी मरे याला मात्र पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. या पराभवासह मरेने टेनिसमधून निवृत्तीही स्वीकारली.

सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना, डेनिसचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला. फेडररच्या मोठ्या अनुभवापुढे डेनिसला टेनिसचे धडेच मिळाले. फेडररने फोरहँडसह आपल्या विशेष बॅकहँड फटक्यांच्या जोरावर डेनिसला पुनरागमनाची संधीच दिली नाही. दुसरीकडे, गेल्या मोसमात पायाच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धांतून माघार घेतलेल्या नदालनेही आश्वासक सुरुवात करताना विजयी सलामी दिली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ७-५ असा पराभव केला.

त्याच वेळी अन्य लढतीत अँडी मरेचा पराभव टेनिस चाहत्यांसाठी जितका धक्कादायक होता, तितकाच तो भावनिकही ठरला. दुखापतींना सामोरे जात असलेल्या मरेने या आधीच यंदाची ऑस्ट्रेलियन स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असे घोषित केले होते. या वेळी पहिल्याच फेरीत २२व्या मानांकित रॉबर्टो बटिस्ता अगुट याने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना मरेचे कडवे आव्हान ६-४, ६-४, ६-७ (५), ६-७(४), ६-२ असे संपुष्टात आणले. या पराभवासह मरेने स्पर्धात्मक टेनिस विश्वाला गुडबायही केले.

महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अँजोलिक कर्बरने स्लोवेनियाच्या पोलोना हर्कोग हिला ६-२, ६-२ असे सहज पराभूत करत विजयी सलामी दिली. अन्य लढतीत कॅरोलिन वोजनियाकीनेही विजयी कूच करताना, बेल्जियमच्या एलिसन वॅन उतिवान्सक हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

नदालने दमदार पुनरागमन करताना शानदार बाजी मारत प्रतिस्पर्धी खेळाडूंना इशारा दिला. फेडररने आपल्या लौकिकानुसार सहज विजयी सलामी देताना विक्रमी जेतेपद पटकावण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. राफा, फेडरर यांनी अपेक्षित खेळ करताना चाहत्यांच्या आशा उंचावल्या. 

महिलांमध्ये कर्बर, शारापोवा यांचा धडाकात्याचप्रमाणे, सर्वात लक्षवेधी राहिला, तो २००८ साली या स्पर्धेत विजेती ठरलेल्या रशियाच्या मारिया शारापोवाचा खेळ. मारियाने शानदार विजयासह सुरुवात करताना ब्रिटनच्या हॅरियट डार्ट हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला.

प्रजनेश गुणेश्वरन पहिल्याच फेरीत बादपहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रजनेशचा ६-७, ३-६, ३-६ असा पराभव झाल्याने, त्याचे ग्रँडस्लॅम पदार्पण निराशाजनक झाले. पहिला सेट टायब्रेकपर्यंत नेल्यानंतर प्रजनेशला आपली लय कायम राखण्यात अपयश आले.

अखेरचा सामना चांगल्या रीतीने संपला - मरेब्रिटनचा दिग्गज खेळाडू अँडी मरे याने रॉबर्टो बतिस्ता आगुट याच्याकडून पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण सामन्यानंतर, ‘ही लढत चांगल्या रीतीने संपली,’ असे मत व्यक्त केले. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू अँडी मरे याने याआधीच आॅस्ट्रेलियन ओपनचा त्याचा सामना शेवटचा ठरू शकतो, असे स्पष्ट केले होते.

या सामन्यात मरे याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. सामना झाल्यानंतर मरे म्हणाला, ‘ही बाब अविश्वसनीय व शानदार होती. आज येथे येण्यासाठी सर्वांचे आभार. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास मला अनेक वर्षांपासून येथे खेळणे आवडते. हा माझा अखेरचा सामना होता आणि तो शानदाररीतीने संपला. मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु ते पुरेशे नव्हते.’’

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनRoger fedrerरॉजर फेडरर