शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open 2026 : जोकोविचच स्वप्न अधुरेच! फायनल जिंकत 'करिअर ग्रँड स्लॅम'सह अल्काराझनं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:32 IST

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला.

Australian Open Final 2026 Carlos Alcaraz Beats Novak Djokovic To Win 1st Aus Open Title : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियन दिग्गज टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा उदयोन्मुख स्टार कार्लोस अल्काराझ यांच्यात जेतेपदासाठी ऐतिहासिक लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत दहा वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील विजेत्या जोकोविचला पराभूत करत कार्लोस अल्काराझनं पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला आहे. दुसरीकडे जोकोविचचे विक्रमी २५ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!मेलबर्नच्या कोर्टवर अनुभवी जोकोविचनं पहिल्या सेट ६-२ असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये तो कमी पडला. युवा अल्काराझनं दमदार कमबॅक करत दुसरा सेट ६-२ आणि तिसरा सेट ६-३ असा आपल्या नावे करत 'करिअर ग्रँडस्लॅम'च्या दिशेनं पाऊल टाकले. चौथ्या सेटमध्ये जोकोनं तगडी फाइट दिली. पण काही चुका त्याला या सेटमधील विजयासह विक्रमी ग्रँड स्लॅमपासूनही दूर घेऊन गेल्या. चौथा सेट ७-५ असा जिंकत अल्काराझनं करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करत नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला. एवढेच नाही तर सर्वात कमी वयात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.   

Elena Rybakina Maiden AUS Open Title : नंबर वन सबालेंकाला पराभवाचा धक्का; एलिना रयबाकिना बनली नवी सम्राज्ञी

अल्काराझनं रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला सर्वात युवा टेनिसपटू

कार्लोस अल्काराझ २२ वर्षे २७२ दिवस वयात किमान एकदा चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकन टेनिस दिग्गज डॉन बड्ज यांच्या नावावर होता. त्यांनी १९३८ च्या फ्रेंच चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या २२ वर्षे ३६३ दिवसांचा असताना करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.

आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सातवे जेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह अल्कराझनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. विम्बल्डनची दोन विजेतेपदे (२०२३, २०२४), फ्रेंच ओपनची दोन विजेतेपदे (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन स्पर्धेत त्याने (२०२२, २०२५) दोन वेळा आपली छाप सोडली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alcaraz defeats Djokovic, wins Australian Open 2026, achieves Career Grand Slam.

Web Summary : Carlos Alcaraz defeated Novak Djokovic in the Australian Open 2026 final, securing his first Aus Open title and completing a Career Grand Slam. Alcaraz is the first to defeat Djokovic in an Australian Open final and the youngest to win all four Grand Slams.
टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस