Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:14 IST2021-06-15T20:12:42+5:302021-06-15T20:14:06+5:30
Xiaomi Foldable Smartphone : यापूर्वी कंपनीनं मार्च महिन्यात एक फोल्डेबल स्मार्टफोन केला होता लाँच. कंपनी आता आणखी फोन आणण्याच्या तयारीत.

Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स
Xiaomi नं मार्च महिन्यात आपला पहिला स्मार्टफोन Mi MIX Fold लाँच केला होता. आता कंपनी बाजारात आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनचा मॉडेल नंबर J18s असा आहे. या स्मार्टफोन लाँच होण्यासाठी अजून वेळ असला तरी अनेक ठिकाणी या स्मार्टफोनशी निगडीत माहिती समोर आली आहे.
डिजिटल चॅट स्टेशननुसार शाओमीचा हा स्मार्टफोन या वर्षाच्या चौथ्या तिमाहित लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये आतील बाजूला आणि बाहेरील बाजूला दोन्ही ठिकाणी डिस्प्ले असेल. यशिवाय हा स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेटसह येणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 हा प्रोसेसही दिला आहे.
कशी असेल बॅटरी क्षमता?
या स्मार्टफोमध्ये शाओमी 5000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. तसंच हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आली नाही. परंतु यापूर्वी आलेल्या लिक्सनुसार या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो आणि हा डिस्प्ले सॅमसंगनं (Samsung) तयार केला आहे. याशिवाय या स्मार्टफोनचा एक्स्टर्नल डिस्प्ले हा 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. याशिवाय कंपनी सेल्फीसाठी अंडर डिस्प्ले कॅमेराही ऑफर करू शकते.
फोटोग्राफीच्या चाहत्यांसाठी या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरसह 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन लूकबाबत यापूर्वीच्या फोल्डेबल फोनप्रमाणेच असेल.