xiaomi mi mix fold foldable smartphone worth 400 million yuan sold out in 1 minute | केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री

केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री

ठळक मुद्देXiaomi च्या या स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ.३० मार्चला लाँच करण्यात आला होता स्मार्टफोन

Xiaomi च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Mi Mix Fold ची ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ होती. कंपनीनं ३० मार्च रोजी हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीनं नुकताच याचा पहिला सेलही आयोजित केला होता. या सेलदरम्यान केवळ एका मिनिटांत जवळपास 400 दशलक्ष युआन म्हणजे जवळपास 459 कोटी रूपयांच्या स्मार्टफोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या स्मार्टफोनच्या किती युनिट्सची विक्री झाली याची मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. 

या स्मार्टफोनची किंमत 12,999 युआन म्हणजेच दीड लाखांच्या जवळपास आहे. या हिशोबानं या स्मार्टफोन्सचे ३० हजारपेक्षा अधिक युनिट्स विकले गेल्याची शक्यता आहे. शाओमीचे स्मार्टफोन स्वस्त स्मार्टफोन्स म्हणून ओळखले जातात. Mi Mix Fold हा स्मार्टफोन कंपनीच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनपैकी एक आहे. परंतु एका मिनिटात इतकी विक्री होणं हे कंपनीचं फॅन फॉलोविंग किती आहे हे दाखवून देतं. 

काय आहे विशेष?

Mi Mix Fold या स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. पहिला डिस्ल्पे 8.01 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. तर दुसरा एक्स्टरनल स्क्रिन 6.52 इंचाचा आहे. या फोनसोबत Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात 16GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळतं.  यात 5020mAh च्या बॅटरीसह 67W वायर्ड चार्जिंग सपोर्ट करतं. 

डिस्प्ले व्यतिरिक्त या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात 108 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 123 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसोबक 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसंच 8 मेगापिक्सेल लिक्विड लेन्स देण्यात आली आहे. तक सेल्फीच्या चाहत्यांसाठी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 20 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेराही देण्यात आला आहे. 

Web Title: xiaomi mi mix fold foldable smartphone worth 400 million yuan sold out in 1 minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.