शाओमीची जय्यत तयारी! Xiaomi Mi Mix 4, Mi CC11, आणि Mi Pad 5 सीरीज लाँचसाठी सज्ज 

By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 12:40 PM2021-07-21T12:40:21+5:302021-07-21T12:41:21+5:30

Xiaomi Mi Mix 4, Mi Cc11, Mi Pad 5: Xiaomi चे Mi MIX 4, Mi CC11 आणि Mi Pad 5 series हे आगामी डिवाइस 3C या सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत.

Xiaomi mi mix 4 mi cc11 and mi pad 5 series get 3c certification  | शाओमीची जय्यत तयारी! Xiaomi Mi Mix 4, Mi CC11, आणि Mi Pad 5 सीरीज लाँचसाठी सज्ज 

शाओमीची जय्यत तयारी! Xiaomi Mi Mix 4, Mi CC11, आणि Mi Pad 5 सीरीज लाँचसाठी सज्ज 

Next

Xiaomi पुढील काही आठवड्यांत एकसाथ अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे. ही माहिती 3C या सर्टिफिकेशन साईटवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात एका टॅबलेट सीरिजचा देखील समावेश आहे. Xiaomi चे Mi MIX 4, Mi CC11 आणि Mi Pad 5 series हे आगामी डिवाइस 3C या सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत. या लिस्टिंगमधून या डिव्हाइसेसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.  ((Xiaomi Mi Mix 4, Mi Cc11, And Mi Pad 5 Series Get 3c Certification)

Xiaomi Mi MIX 4 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन मॉडेल नंबर 2106118C सह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार यात 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिला जाऊ शकते. त्याचबरोबर Xiaomi CC 11 सीरिज देखील 3C सर्टिफिकेशनवर दिसला आहे. हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असेल, अशी माहिती रिपोर्ट्स मधून समोर आली आहे. हा शाओमी स्मार्टफोन मॉडेल नंबर 2107119DC सह लिस्ट करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये Xiaomi CC 11 आणि CC 11 Pro असे दोन स्मार्टफोन्स येऊ शकतात, त्यापैकी हा कुठला मॉडेल आहे हे स्पष्ट झाले नाही. परंतु या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.  

Xiaomi च्या आगामी Mi Pad 5 टॅबलेट सीरिजचे 3 डिवाइस 3C सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आहेत. या सीरिजमध्ये Mi Pad 5 Lite, Pad 5 Pro आणि Pad 5 Plus असे तीन मॉडेल येऊ शकतात. यातील Mi Pad 5 Lite टॅबलेट 3C सर्टिफिकेशनवर कोडनेम K82 आणि मॉडेल नंबर 21051182C सह दिसला आहे. शाओमीच्या हा टॅब पण 33W फास्ट चार्जला सपोर्ट करेल. 

Xiaomi Mi Pad 5 Plus देखील 3C सर्टिफिकेशनवर कोडनेम “K81A” आणि मॉडेल नंबर M2105K81AC सह दिसला आहे. या डिवाइसमध्ये 67W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. Mi Pad 5 Pro टॅबचे कोडनेम ‘K81’ असून यात देखील 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. या टॅबचा मॉडेल नंबर M2105K81C आहे. 

Web Title: Xiaomi mi mix 4 mi cc11 and mi pad 5 series get 3c certification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app