शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi: थेट आयफोनला टक्कर? शाओमीचा सर्वात दमदार फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:30 IST

Xiaomi 17 Ultra Lauched In India: स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी शाओमीने आज त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन शाओमी १७ अल्ट्रा भारतात लॉन्च केला आहे.

स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी शाओमीने आज त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनशाओमी १७ अल्ट्रा भारतात लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हाय-एंड कॅमेरा सेटअप आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेला हा फोन बाजारातील इतर प्रीमियम स्मार्टफोन्सना तगडी टक्कर देईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

शाओमी १७ अल्ट्रामध्ये ६.९-इंचाचा Xiaomi HyperRGB OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची ब्राइटनेस ३५०० nits इतकी आहे, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. फोनचे वजन २१८.४ ग्रॅम असून तो ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, जो सध्याच्या काळातील सर्वात वेगवान प्रोसेसरपैकी एक मानला जातो. यात १६ जीबी LPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी यूएफएस ४.१ स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित Xiaomi HyperOS 2 वर चालतो.

फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी हा फोन खास ठरणार आहे. यात ५० मेगापिक्सेल (f/१.६७ अपर्चर आणि OIS सपोर्ट) प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय, यात २०० मेगापिक्सेलचा (f/२.३९ ते f/२.९६ अपर्चर, OIS सह) टेलिफोटो कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल (f/२.२ अपर्चर) अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतोय. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनममध्ये ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६०००mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ती ९०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉकची सुविधा आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP65 + IP66 रेटिंग मिळाले आहे.

शाओमी १७ अल्ट्रा: किंमत आणि ऑफर्स

१६ जीबी रॅम/ ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹१ लाख ३९ हजार ९९९ निश्चित करण्यात आली आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना अनेक ऑफर मिळत आहेत. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना ₹१०,००० पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. १३ ते १७ मार्च दरम्यान फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹१९,९९९ किमतीचा 'Xiaomi Professional Photography Kit Pro' मोफत मिळणार आहे. हा फोन १८ मार्चपासून Amazon आणि Xiaomi India च्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Xiaomi 17 Ultra Launched in India: A Direct iPhone Competitor?

Web Summary : Xiaomi launched its flagship, the 17 Ultra, in India. It boasts a Snapdragon 8 Elite Gen 5 chip, 6.9-inch display, 200MP camera, and 6000mAh battery. Priced at ₹1,39,999, it challenges premium smartphones.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनxiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान