16GB रॅमसह येऊ शकतो Xiaomi Civi Pro स्मार्टफोन; डिस्प्ले आणि बॅटरीची माहिती देखील लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:25 PM2021-10-05T18:25:30+5:302021-10-05T18:25:41+5:30

New Xiaomi Phone Xiaomi Civi Pro: शाओमीचा आगामी स्मार्टफोन 2109119BC या मॉडेल नंबरसह TENAA सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. हा स्मार्टफोन आगामी Xiaomi Civi Pro आहे, अशी चर्चा आहे.

Xiaomi civi pro listed on tenaa launch soon with 16gb ram  | 16GB रॅमसह येऊ शकतो Xiaomi Civi Pro स्मार्टफोन; डिस्प्ले आणि बॅटरीची माहिती देखील लीक 

16GB रॅमसह येऊ शकतो Xiaomi Civi Pro स्मार्टफोन; डिस्प्ले आणि बॅटरीची माहिती देखील लीक 

Next

शाओमीने काही दिवसांपूर्वी आपली नवीन सीरीज Civi सादर केली होती. या सीरिज अंतर्गत Xiaomi Civi स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. कंपनीने हा फोन खास महिलांसाठी सादर केला असल्याचे म्हटले होते. आता या सीरीजमध्ये अजून एक फोन सादर केला जाऊ शकतो. आगामी Xiaomi Civi Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट TENAA वर लिस्ट करण्यात आला आहे.  

शाओमीचा आगामी स्मार्टफोन 2109119BC या मॉडेल नंबरसह TENAA सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. हा स्मार्टफोन आगामी Xiaomi Civi Pro आहे, अशी चर्चा आहे. या लिस्टिंगमध्ये सीवी प्रोच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. परंतु कंपनीने मात्र असा कोणताही स्मार्टफोन बाजारात येणार नसल्याचे सांगितले आहे.  

Xiaomi Civi Pro ची TENAA लिस्टिंग 

टेना लिस्टिंगनुसार, या फोनच्या स्पेसिफिकेशनमध्ये आणि Xiaomi Civi च्या स्पेक्समध्ये जास्त फरक दिसत नाहीत. Xiaomi Civi Pro टेनावर 6.55 इंचाच्या ओलेड स्क्रीनसह लिस्ट करण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 3,840×2,160 पिक्सल आहे. या फोनमध्ये कंपनी 2.4GHz स्पीड असलेला ऑक्ट-कोर प्रोसेसर देऊ शकते. हा फोन 16 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंतच्या स्टोरेजच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटसह वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. Xiaomi Civi Pro स्मार्टफोन 4,400 एमएएच बॅटरीसह लिस्ट करण्यात आला आहे.  

Xiaomi CIVI चे स्पेसिफिकेशन   

Xiaomi CIVI मध्ये 6.55 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Shiny Black, Lighty Blue आणि Peach कलरमध्ये बाजारात आला आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 सह मीयुआय 12.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटचा वापर करण्यात आला आह. सोबत 12GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.   

Xiaomi CIVI मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8 MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 MP ची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ड्युअल सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि स्कीन रिन्यूवल टेक्नॉलॉजीसह 32 मेगापिक्सलचा Samsung GD1 सेन्सर देण्यात आला आहे. हा नवीन शाओमी फोन 4,500एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो जी 55वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. 

Web Title: Xiaomi civi pro listed on tenaa launch soon with 16gb ram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.