भाजी-फळे ताजी की शिळी, ‘एआय’ सांगणार सेकंदात! कशी होते तपासणी? झटपट समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:35 IST2025-06-05T09:34:57+5:302025-06-05T09:35:16+5:30

आता स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे ॲप व फीचर्स ही कामे करणार

Whether vegetables and fruits are fresh or stale AI will tell in seconds! How is the inspection done? Understand it instantly | भाजी-फळे ताजी की शिळी, ‘एआय’ सांगणार सेकंदात! कशी होते तपासणी? झटपट समजून घ्या

भाजी-फळे ताजी की शिळी, ‘एआय’ सांगणार सेकंदात! कशी होते तपासणी? झटपट समजून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बाजारातून भाज्या अथवा फळे आणताना आई या नीट पारखून घेत असते. भाजी ताजी आहे का, फळे चांगली आहेत का, याची खात्री करून घेते. ही कामे आता स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप व फीचर करू लागले आहे.

स्मार्टफोनमधील ‘चॅटजीपीटी’सारखे टुल्स अथवा लाइव्ह व्हिडीओ फीचर ही कामे करण्यास सक्षम असल्याचे समोर आले आहे. या साधनांद्वारे इमेज इनपुट आणि व्हिडीओ ॲनॅलिसिसचा वापर करून फळे आणि भाज्या ताज्या आहेत की नाही, हे जाणून घेता येऊ शकते.

कशी होते तपासणी?

एआय फळे आणि भाज्यांचा रंग, पोत, डाग आणि सडण्याच्या प्रक्रियेची प्रारंभिक लक्षणे तपासते. त्यानंतर चॅटजीपीटीचे नवे व्हिडीओ फीचर ‘सोरा’ तुम्हाला मदत करू शकते. फळे व भाज्यांचा छोटा व्हिडीओ बनवून तुम्ही एआयला दाखवून मत मागवू शकता.

Web Title: Whether vegetables and fruits are fresh or stale AI will tell in seconds! How is the inspection done? Understand it instantly