WhatsApp चा नवा नियम! आता फोनमधून सिम कार्ड काढताच व्हॉट्सॲप होईल बंद! जाणून घ्या काय आहे 'सिम बाइंडिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:45 IST2026-02-24T09:45:21+5:302026-02-24T09:45:57+5:30
WhatsApp SIM Binding Update : सायबर फ्रॉड रोखण्यासाठी व्हॉट्सॲप भारतात सिम बाइंडिंग फिचर आणत आहे. आता फोनमध्ये सिम असल्याशिवाय चॅटिंग करता येणार नाही. सविस्तर वाचा.

WhatsApp चा नवा नियम! आता फोनमधून सिम कार्ड काढताच व्हॉट्सॲप होईल बंद! जाणून घ्या काय आहे 'सिम बाइंडिंग'
सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, आता व्हॉट्सॲप वापरण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. व्हॉट्सॲपने भारतात 'सिम बाइंडिंग' फिचरवर काम सुरू केले असून, यानुसार तुमच्या फोनमध्ये सक्रिय सिम कार्ड असल्याशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सध्याच्या नियमांनुसार, एकदा व्हॉट्सॲप रजिस्टर केल्यावर सिम कार्ड फोनमध्ये नसले तरीही वाय-फाय किंवा दुसऱ्या इंटरनेटच्या मदतीने व्हॉट्सॲप वापरता येते. मात्र, नवीन अपडेटनंतर व्हॉट्सॲप केवळ त्याच फोनमध्ये चालेल ज्यामध्ये नोंदणीकृत सिम कार्ड प्रत्यक्षरीत्या उपलब्ध आहे. जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढले किंवा बदलले, तर व्हॉट्सॲप आपोआप काम करणे बंद करेल.
दूरसंचार विभागाने (DoT) सायबर ठग आणि बनावट नंबरच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. अनेकदा सायबर गुन्हेगार एका सिमवर व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट करून ते सिम नष्ट करतात किंवा दुसऱ्या फोनमध्ये वापरतात. सिम बाइंडिंगमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.
कधीपासून लागू होणार?
WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन (2.26.8.6) मध्ये या फिचरची चाचणी सुरू आहे. लवकरच हे अपडेट सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी अनिवार्य केले जाणार आहे. UPI ॲप्समध्ये (उदा. Google Pay, PhonePe) सिम बाइंडिंगची सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे, आता ती व्हॉट्सॲपसाठीही लागू होईल.