मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:06 IST2024-12-23T15:05:37+5:302024-12-23T15:06:29+5:30
WhatsApp : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp काम करणं बंद करणार आहे.

मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp काम करणं बंद करणार आहे. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनचा सपोर्ट बंद करणारा आहे. हे जवळजवळ प्रत्येक वर्षी घडतं, जेव्हा WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सपोर्ट करणं बंद करतं. नवीन फीचर्स जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करत नाहीत आणि काहीवेळा हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते.
तुम्ही अजूनही अँड्रॉइडचं किटकॅट व्हर्जन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर WhatsApp आपला सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ १ जानेवारी २०२५ नंतर WhatsApp किटकॅट व्हर्जनवर असलेल्या फोनवर चालू शकणार नाही. तुम्हाला हे करणं थांबवायचं असल्यास, तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा नवीन फोन घ्यावा लागेल.
'या' फोनवर चालणार नाही WhatsApp
WhatsApp १ जानेवारी २०२५ पासून या फोन्ससाठी आपला सपोर्ट बंद करणार आहे
Samsung
Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini
HTC
One X, One X+, Desire 500, Desire 601
Sony
Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V
LG
Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
Motorola
Moto G, Razr HD, Moto E 2014
WhatsApp चं नवीन फिचर्स वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. बग दूर करण्यासाठी कंपनी सिक्योरिटी अपडेट जारी करत असते. ॲप अपडेट न केल्यास या बग्समुळे नुकसान होऊ शकतं. यामुळे ॲप वापरण्याचा अनुभव खराब होण्याची आणि पर्सनल माहिती चोरी होण्याची भीती आहे.