व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:17 IST2026-02-27T14:16:21+5:302026-02-27T14:17:29+5:30

सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब संथ गतीने चालत असून, अनेक युजर्सना मेसेज पाठवताना आणि लॉग-इन करताना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

WhatsApp Web down! Chatting stopped during work hours; iPhone users hit hard | व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका

व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका

जगप्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपच्या डेस्कटॉप आवृत्तीला म्हणजेच 'व्हॉट्सॲप वेब'ला आज सकाळी तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसला आहे. सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब संथ गतीने चालत असून, अनेक युजर्सना मेसेज पाठवताना आणि लॉग-इन करताना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कामाच्या वेळीच हा अडथळा आल्याने ऑफिसमध्ये डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काय आहेत तक्रारी?

इंटरनेट आऊटेजवर नजर ठेवणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' या वेबसाइटनुसार, सकाळी ११:४८ वाजण्याच्या सुमारास तक्रारींचा ओघ सर्वाधिक वाढला होता. जवळपास ६५ टक्के युजर्सनी वेबसाइटमध्ये अडचण येत असल्याचे सांगितले, तर २७ टक्के युजर्सना ॲप आणि ७ टक्के युजर्सना लॉग-इन करताना तांत्रिक समस्या जाणवल्या.

आयफोन युजर्सना जास्त त्रास

अनेकांचे म्हणणे आहे की, व्हॉट्सॲप वेब लोड होताना प्रचंड वेळ लागत आहे. विशेषतः आयफोन वापरणाऱ्या युजर्सना याचा त्रास जास्त होत असून, क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर स्क्रीन तिथेच अडकून पडत आहे. तसेच, मोबाइल आणि डेस्कटॉपमधील चॅट सिंक न होणे, मेसेज डिलिव्हरीला उशीर होणे आणि जुन्या चॅट्स न उघडणे अशा तक्रारींचा सोशल मीडियावर पाऊस पडला आहे.

कंपनीचे मौन कायम

व्हॉट्सॲप वेबमधील या बिघाडावर कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा बिघाड केवळ भारतातील विशिष्ट भागापुरता मर्यादित आहे की जागतिक स्तरावर, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हरवर ताण आल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युट्यूबलाही बसला होता फटका

काही दिवसांपूर्वीच गुगलच्या मालकीचे युट्यूबही काही काळासाठी डाउन झाले होते. त्यावेळी युजर्सना होमपेज आणि युट्यूब किड्स वापरताना अडचणी आल्या होत्या. काही तासांनंतर तांत्रिक दोष दुरुस्त करून ही सेवा पूर्ववत करण्यात आली होती.

Web Title : व्हाट्सएप वेब डाउन: उपयोगकर्ताओं को काम के दौरान समस्याएँ।

Web Summary : व्हाट्सएप वेब में तकनीकी खराबी आई, जिससे विश्व स्तर पर उपयोगकर्ता प्रभावित हुए। कई लोगों ने लॉग इन, संदेश वितरण और सिंकिंग में समस्याओं की सूचना दी, खासकर iPhone उपयोगकर्ताओं ने। कंपनी ने अभी तक इस आउटेज पर कोई टिप्पणी नहीं की है, जिससे कई लोगों का काम बाधित हुआ।

Web Title : WhatsApp Web Down: Users face issues during work hours.

Web Summary : WhatsApp Web faced technical issues, impacting users globally. Many reported problems with logging in, message delivery, and syncing, especially iPhone users. The company hasn't commented on the outage, which disrupted work for many.