शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Windows युजर्ससाठी नवीन Whatsapp वर काम सुरु; चॅटिंग होणार वेगवान  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 4:13 PM

Whatsapp UWP App Download: WhatsApp सध्या यूनिवर्सल विंडोज अ‍ॅप (UWP) वर काम करत आहे. हे नवीन अ‍ॅप अगदी सुरुवातीपासून बनवण्यात येत आहे.  

जे लोक सतत लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करतात ते देखील व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. सध्या वेब व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच विंडोजसाठी उपलब्ध असलेल्या अ‍ॅपमध्ये देखील तीच टेक्नॉलॉजी वापरली जाते. परंतु आता डेस्‍कटॉप युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपचा अनुभव बदलणार आहे. या अ‍ॅपचे नवीन व्हर्जन विंडोज युजर्ससाठी आले आहे. सध्या बीटा व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्ट स्‍टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.  

युजर्स हे बीटा व्हर्जन डेस्कटॉपवर इन्स्टॉल करून वापरू शकतात. यातील नवीन फीचर्सची माहिती घेऊ शकतात. एकीकडे विंडोज युजर्सना नवीन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप मिळत आहे. मात्र macOS युजर्ससाठी नवीन व्हर्जनची माहिती मात्र अजूनही मिळाली नाही.  

व्हॉट्सअ‍ॅपने पूर्णपणे नवीन यूनिवर्सल विंडोज अ‍ॅप (UWP) तयार केले आहे. या अ‍ॅपच्या विंडोज 11 व्हर्जनमध्ये रिन्‍यूड एक्रिलिक ग्राफिक इफेक्‍ट्स देखील बघायला मिळतील. नवीन डेस्‍कटॉप व्हर्जन खूप वेगवान असेल आणि अ‍ॅप स्‍टार्ट होण्यासाठी फक्त एका सेकंदाचा वेळ लागेल. या नव्या अ‍ॅपमध्ये नवीन ड्रॉइंग फंक्‍शन आहे परंतु स्‍टीकर्स मात्र दिसत नाहीत. फायनल व्हर्जनमध्ये मोबाईल अ‍ॅपमधील सर्व फंक्शन्स असतील अशी अपेक्षा आहे.  

नवीन अ‍ॅप macOS साठी देखील उपलब्ध होईल, असे याआधी सांगण्यात आले होते. जे मॅक कॅटालिस्‍टवर आधारित असेल. त्यामुळे फक्त मॅक नव्हे तर आयपॅड युजर्स देखील या अ‍ॅपचा वापर करू शकतील. मॅक आणि आयपॅड युजर्सना मात्र काही काळ वाट बघावी लागेल. जोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप चे macOS व्हर्जन येत नाही तोपर्यंत iPaवर देखील व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉप