शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

WhatsApp वापरणाऱ्यांनो आधी पुरावा द्या; एखाद्याला रिपोर्ट केल्यास पहिली अट

By हेमंत बावकर | Published: November 05, 2020 5:00 PM

WhatsApp : भारतीयांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सापडणार नाही असे होऊच शकणार नाही. एसएमएस, एमएमएसची हवाच या सोशल मेसेंजिग अ‍ॅपने काढून टाकली आहे.

नवी दिल्ली : इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp दरवेळेला काहीना काही नवीन फिचर युजरना देत असते. असेच एक फिचर याआधीच देण्यात आले होते. यामध्ये एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक करणे किंवा त्याचा रिपोर्ट करणे हा पर्याय देण्यात आला होता. त्रास म्हणजे नेमके काय करतो, याचे आता पुरावे व्हॉट्सअ‍ॅपला द्यावे लागणार आहेत. 

नवीन फिचरमध्ये युजरला एखादे व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट रिपोर्ट करायचे असेल तर आधी पुरावा द्यावा लागणार आहे. हा पुरावा म्हणून युजरला त्याचे लेटेस्ट चॅट व्हॉट्सअ‍ॅपला शेअर करावे लागणार आहेत. एका रिपोर्टनुसार हे फिचर 2.20.206.3 अँड्रॉईड व्हर्जनवर मिळाले आहे. सध्या हे फिचर बीटा युजर वापरू शकतात. 

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर युजर कोणत्याही स्पॅमिंग किंवा हॅरॅसमेंटची शिकार होत असतील तर त्यांना ते कॉन्टॅक्ट किंवा बिझनेस अकाऊंटचा रिपोर्ट करता येतो. नवीन फिचरनुसार हा रिपोर्ट करताना कारवाईसाठी त्याचे कारणही हवे असणार आहे. 

महत्वाचे म्हणजे या फिचरमुळे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा नंबर रिपोर्ट केला तर तुम्हाला एक मेसेज दिसणार आहे. यामध्ये 'Most recent messages from this user will be forwarded to WhatsApp. असे लिहिलेले असणार आहे. यानुसार तुम्हाला आलेले त्या व्यक्तीचे मॅसेज व्हॉट्सअॅपला फॉरवर्ड केले जाणार आहेत. Wabetainfo नुसार व्हॉट्सअ‍ॅप ते चॅट पडताळल्यानंतर त्या अकाऊंटविरोधात कारवाई करणार आहे. 

कोण कोणते चॅट तुमच्या मोबाईलची स्टोरेज स्पेस खातेय? WhatsApp मध्ये असे चेक करा

भारतीयांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सापडणार नाही असे होऊच शकणार नाही. एसएमएस, एमएमएसची हवाच या सोशल मेसेंजिग अ‍ॅपने काढून टाकली आहे. परंतू, जगभरात प्रसिद्ध असेलेले हे WhatsApp आता डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण बॅकअपसह मीडियासाठी एवढी स्पेस खातेय की हळूहळू मोबाईलमधील स्टोरेज संपू लागले आहे. कंपनीचे ग्रुप, फॅमिलीचे ग्रुप, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप यासह सोसायटी, पक्ष आदी ग्रुप असा मेसेजचा ढिगाराच आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये साचू लागला आहे. फेसबुकने म्हटल्यानुसार जगभरातून 100 अब्ज मेसेज दिवसाला पाठविले जात असतात. आता तुम्हाला सर्वाधिक मेसेज कोणाचे, कोणाचे मेसेज जास्त जागा खातात हे देखील पाहता येणार आहे. 

हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप