हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 05:49 PM2020-10-30T17:49:29+5:302020-10-30T17:51:00+5:30

Indian Army : आर्मी द्वारे बनविण्यात आलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे काम करते. एंड टू एंड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला आहे.

Hats of Indian Army; Launched messaging app like WhatsApp SAI | हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

Next

'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत भारतीय आर्मीने एक नवीन मेसेजिंग अ‍ॅप डेव्हलप केले आहे. आर्मीने या अ‍ॅपला 'Secure Application for the Internet (SAI)' नाव दिले आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एंड टू एंड सिक्युअर व्हॉईस, टेक्स्ट आणि व्हीडिओ कॉलिंग सर्व्हिस देणार आहे. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. 


मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. आर्मी द्वारे बनविण्यात आलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे काम करते. एंड टू एंड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला आहे. SAI लोकल इन-हाउस सर्व्हर आणि कोडिंगद्वारे सुरक्षेसाठी इतर अ‍ॅपपेक्षा चांगले आहे. ही फिचर गरजेनुसार बदलताही येतात. 


हे अ‍ॅप CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुपकडून तपासण्यात आले आहे. तसेच NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंगचे काम सुरु आहे. याशिवाय हे अ‍ॅप आयओएसवरही लाँच केले जाणार आहे. यासाठी डेव्हलपमेंट सुरु असल्याचे म्हटले आहे. 
संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले की, SAI हे अ‍ॅप लष्करामध्ये वापरले जाणार आहे. कारण याची सेवा सुरक्षा पुरविणार आहे. अ‍ॅपचे फंक्शन रिव्ह्यू केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांना अ‍ॅप बनविण्यासाठी अभिनंदन केले. 

WhatsApp वेबवरून काम करणं सोपं होणार; व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंगची मजा घेता येणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍प वेब वापरताना देखील चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. लवकरच व्हॉट्सअ‍प युजर्संना वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर मिळण्याची शक्यताआहे. एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग आणण्यासाठी काम करत आहे. 

वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नवीन अपडेटनंतर या फीचर पाहण्यात आलं होतं. कंपनी पब्लिक रिलीज आधी याची चाचणी करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल आधीपासूनच अँड्रॉईड व आयओएस अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. मात्र आता ही सुविधा डेकस्टॉप व्हर्जनवर देखील मिळू शकते. व्हॉट्सअ‍ॅप फीचरला ट्रॅक करणारे ट्विटर अकाउंट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट अपडेट सोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर 2.2043.7 व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे. 

Web Title: Hats of Indian Army; Launched messaging app like WhatsApp SAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.