शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 13:33 IST

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळे चॅटिंगमधली गंमत वाढून ते आणखी मजेशीर होतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळे चॅटिंगमधली गंमत वाढून ते आणखी मजेशीर होतं. अशीच आणखी काही भन्नाट फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपने आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कॅटलॉग शॉर्टकट, व्हॉट्सअ‍ॅप डूडल आणि न्यू कॉल बटण अशी तीन जबरदस्त फीचर्स आणली आहेत. WABetaInfo ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार,अँड्रॉईड बीटाच्या लेटेस्ट कोडवर हे फीचर्स दिसले आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप संबंधित बातमी आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने या नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपला बीटा व्हर्जन 2.20.200.3 ची गरज असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन कॉल बटणाची टेस्टिंग केली जात आहे. नवीन कॉल बटणला कंपनी सुरूवातीला बिजनेस चॅट्ससाठी ऑफर करणार आहे. नवीन कॉल बटण हे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी शॉर्टकट म्हणून देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलच्या शॉर्टकटचा ऑप्शन मिळणार 

नव्या बटणावर टॅप केल्यानंतर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलच्या शॉर्टकटचा ऑप्शन मिळणार आहे. युजर्स त्याला हवा असलेला ऑप्शन निवडू शकतात. तसेच कंपनी बिझनेस चॅटसाठी क्विक शॉर्टकट घेऊन येण्याची तयारी करत आहे. हे फीचर आता विकसित केले जात आहे. याला इनेबल केल्यानंतर कॉल बटणच्या बाजूला एक शॉर्टकट अ‍ॅड होणार आहे. मात्र याबाबत अद्याप जास्त माहिती मिळालेली नाही. 

व्हॉट्सअ‍ॅप सॉलिड वॉ़लपेपरमध्ये डूडल 

व्हॉट्सअ‍ॅप आपले वॉलपेपर फीचरला आणखी चांगले बनवण्यासाठी काम करीत आहे. यात एक व्हॉट्सअ‍ॅप सॉलिड वॉ़लपेपरमध्ये डूडल अ‍ॅड करण्याची सुविधा आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.20.200.3 मध्ये या फीचरला WhatsApp Doodles नावाने स्लॉट केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर हा केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग सुरक्षित राहावं, आपल्या व्यतिरिक्त ते इतर कोणी वाचू नये असे अनेकांना वाटत असतं. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने देखील आपल्या युजर्सना कमाल सुविधा दिली आहे. काही जबरदस्त सेटिंग्सच्या मदतीने हे करणं सहज शक्य आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान