CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 09:41 AM2020-09-11T09:41:39+5:302020-09-11T10:02:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, कोरोना व्हायरस नष्ट झाला असं म्हटलं आहे.  पश्चिम बंगालचेभाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी हे विधान केलं आहे.

CoronaVirus Marathi News covid 19 is over bengal bjp chief dilip ghosh declares at rally | CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने 44 लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अजब दावा केला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, कोरोना व्हायरस नष्ट झाला असं म्हटलं आहे.  पश्चिम बंगालचेभाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी हे विधान केलं आहे.

पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीदरम्यान मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांना संबोधित करताना घोष यांनी हा अजब दावा केला आहे. कोरोना व्हायरस नष्ट झाला अशी घोषणा केली आहे. "काहींना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. मात्र ते कोरोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीने आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाऊन लागू करत आहेत. भाजपाने बैठका आणि रॅलींचं आयोजन करू नये यासाठी हे केलं जात आहे" असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या - दिलीप घोष 

दिलीप घोष यांनी याआधीही असा अजब दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला होता. "गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते" असं घोष यांनी म्हटलं होतं. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं होतं. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

"गायीच्या दुधामध्ये सोनं असतं"

दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहे. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी याआधी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"

"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"

धक्कादायक! एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नोकरी गेल्याने दाम्पत्याची आत्महत्या

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

Web Title: CoronaVirus Marathi News covid 19 is over bengal bjp chief dilip ghosh declares at rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.