शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

WhatsApp चे नवे अपडेट; स्टेटसवर 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करता येणार, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:37 PM

WhatsApp Status Update: WhatsApp आपल्या स्टेटस अपडेटबाबत एक नवीन फीचर आणले आहे.

WhatsApp New Feature: भारतातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp एकामागून एक नवीन फीचर्स आणत आहे. अलीकडेच कंपनीने स्क्रीनशॉट ब्लॉक, हे नवीन फीचर आणले. त्यानंतर आता कंपनीने स्टेटस व्हिडिओबाबत मोठे अपडेट आणण्याची तयारी केली आहे. हे नवीन फीचर आल्यानंतर युजर्स स्टेटस अपडेटवर एक मिनिटापर्यंतचा व्हिडिओ शेअर करू शकतील.

सध्या व्हॉट्सॲपवर स्टेटसवर फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला जाऊ शकतो. मात्र आता हे नवीन फीचर आल्यानंतर स्टेटस व्हिडिओची वेळ वाढेल. WABetaInfo ने ट्विटरवरुन या नवीन फीचरची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर WABetaInfo ने नवीन फीचरचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे.

या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी कंपनी हे नवीन फीचर बीटा यूजर्ससाठी आणत आहे. बीटा युजर्स Android 2.24.7.6 साठी WhatsApp बीटामध्ये हे अपडेट पाहू शकतात. यूजर्स बऱ्याच दिवसांपासून स्टेटसमध्ये मोठे व्हिडिओ शेअर करण्याची मागणी करत होते. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण होत आहे. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतरच हे फीचर इतर युजर्ससाठी सुरू केले जाईल.

स्टेटस अपडेट फीचरशिवाय व्हॉट्सॲप आणखी एका फीचरवरही काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही व्हॉट्सॲपवर UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करू शकाल. WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनी या फीचरची बीटा चाचणी करत आहे. चाचणी झाल्यानंतरच हे फीचर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया