Join us  

कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 4:29 PM

Kartiki gaikwad: कार्तिकीने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

'लिटील चॅम्प'फेम कार्तिकी गायकवाडच्या (kartiki gaikwad) घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कार्तिकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये तिची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कार्तिकी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. म्हणूनच, तिने तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंददेखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कार्तिकीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोबतच तिने तिच्या बाळाच्या चिमुकल्या हातांचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कार्तिकीने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो पोस्ट करत ती प्रेग्नंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता तिच्या घरी खऱ्या अर्थाने चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर आता चाहते तिच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसा रे ग म पटिव्ही कलाकार