‘व्हॉट्सॲप’ आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही; पालकांकडे असेल कॉन्टॅक्ट लिस्टचा ‘कंट्रोल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 06:33 IST2026-03-13T06:32:56+5:302026-03-13T06:33:14+5:30

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या व्हॉट्सॲपने आपल्या धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

WhatsApp now available for children under 13; Parents will have control over contact list! | ‘व्हॉट्सॲप’ आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही; पालकांकडे असेल कॉन्टॅक्ट लिस्टचा ‘कंट्रोल’!

‘व्हॉट्सॲप’ आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही; पालकांकडे असेल कॉन्टॅक्ट लिस्टचा ‘कंट्रोल’!

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या व्हॉट्सॲपने आपल्या धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आतापर्यंत १३ वर्षांखालील मुलांना व्हॉट्सॲप वापरण्यास अधिकृत परवानगी नव्हती. मात्र, आता पालकांच्या थेट नियंत्रणाखाली लहान मुलेही व्हॉट्सॲप वापरू शकणार आहेत. मेटा कंपनीने यासाठी ‘पालक-नियंत्रित खाते’ ही नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत, तज्ज्ञ आणि पालकांच्या सल्ल्यानंतर व्हॉट्सॲपने हे पाऊल उचलले आहे. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर आणि टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात आहे. 

पालकांचे ‘कवच’

पालकांनी परवानगी दिलेले नंबरच मुलांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतील. त्यामुळे मुले कोणाशी संवाद साधू शकतील, यावर पालकांचे नियंत्रण राहील. मुलांच्या खात्यातील प्रायव्हसी सेटिंग किंवा इतर बदल करण्यासाठी पालकांना एक ‘पिन’ सेट करावा लागेल. त्याशिवाय मुले स्वतःहून कोणतेही बदल करू शकणार नाहीत. मुलांचे खाते मेसेजिंग आणि कॉलिंगसाठी मर्यादित असेल, जेणेकरून त्यांना अनावश्यक ‘फीचर्स’पासून दूर ठेवता येईल.

नेमके काय बदलणार?

व्हॉट्सॲपच्या नियमांनुसार, खाते उघडण्यासाठी किमान वय १३ वर्षे असणे अनिवार्य होते. मुले चुकीचे वय सांगून खाते उघडत असत. आता पालकांसमक्ष खाते उघडले जाईल.

सुरक्षेची हमी कायम!

पालकांचे नियंत्रण असले, तरी व्हॉट्सॲपचे ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ कायम आहे. म्हणजेच, मुले आणि त्यांच्या संपर्कातील लोकांमधील संवाद तिसरी व्यक्ती वाचू शकणार नाही.

Web Title : व्हाट्सएप पर 13 वर्ष से कम उम्र के बच्चे, अभिभावकों का नियंत्रण!

Web Summary : व्हाट्सएप ने 13 साल से कम उम्र के बच्चों के लिए अभिभावक नियंत्रण सुविधा शुरू की। माता-पिता संपर्क प्रबंधित कर सकते हैं, पिन के माध्यम से गोपनीयता नियंत्रित कर सकते हैं। खाते संदेश/कॉलिंग तक सीमित हैं। एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरक्षित संचार सुनिश्चित करता है। यह वर्तमान में परीक्षण चरण में है।

Web Title : WhatsApp for Under 13s with Parental Control: New Feature

Web Summary : WhatsApp now allows under 13s with parental control. Parents manage contacts, privacy via PIN. Accounts are messaging/calling limited. End-to-end encryption remains, ensuring secure communication. It's currently in the experimental phase.