शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp चा धमाका! iPhone मध्ये एकाच वेळी चालणार २ अकाउंट्स; आले भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:10 IST

WhatsApp कडून अनेक नवीन फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे. या फीचर्सची माहिती 'Wabetainfo' ने शेअर केली आहे.

WhatsApp कडून अनेक नवीन फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे. या फीचर्सची माहिती 'Wabetainfo' ने शेअर केली आहे. नवीन अपडेटनुसार, युजर्सना चॅट्स मॅनेज करणं आणि वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर कंटेंट मॅनेजमेंट करणं आता अधिक सोपं झालं आहे. WhatsApp च्या नवीन अपडेटमध्ये युजर्सना एकूण नवीन फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये स्टोरेज, अकाउंट मॅनेजमेंट, मेसेजिंग टूल्स आणि AI बेस्ड इम्प्रूव्हमेंट समावेश आहे.

स्पेस कमी करणं सोपं

WhatsApp ने नवीन 'स्टोरेज टूल्स' ची घोषणा केली आहे. याद्वारे युजर्स कोणत्याही एका चॅटमधील मोठ्या फाइल्स शोधून त्या डिलीट करू शकतील. यासाठी पूर्ण चॅट डिलीट करण्याची गरज नाही. युजर्सकडे फक्त मीडिया (फोटो-व्हिडीओ) डिलीट करून टेक्स्ट मेसेज सुरक्षित ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

चॅट ट्रान्सफर करणं सोपं

WhatsApp ने चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करणं अधिक सोपं केलं आहे. आता एपलचे iOS आणि गुगलचे अँड्रॉइड या दोन वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. युजर्स क्लाउड बॅकअपशिवाय थेट मेसेज, फोटो आणि व्हिडीओ ट्रान्सफर करू शकतील.

iPhone वर 'मल्टी अकाउंट' फीचर

ॲपलच्या iPhone साठी 'मल्टिपल अकाउंट' सपोर्ट जारी करण्यात आला आहे. आता आयफोन युजर्स एकाच एपमध्ये दोन वेगवेगळे नंबर वापरू शकतील. यासाठी एक अकाउंट लॉगआउट न करता फक्त 'स्विच' करावं लागेल. टॅब बारमध्ये प्रोफाईल फोटो दिसेल, ज्यामुळे कोणते अकाउंट सक्रिय आहे हे समजेल. यामुळे पर्सनल आणि कामाचं अकाउंट वेगळं ठेवणं सोपं होईल.

Meta AI सह फोटो एडिटिंग

WhatsApp वर मिळणाऱ्या Meta AI च्या मदतीने आता फोटो एडिटिंगही करता येईल. याद्वारे फोटोमधील नको असलेलं ऑब्जेक्ट्स काढणं, बॅकग्राउंड बदलणं आणि विविध स्टाईल्स वापरणं शक्य होईल. सुरुवातीला हे फीचर काही निवडक लोकांसाठी उपलब्ध असेल.

AI रायटिंग हेल्प फीचर

'रायटिंग हेल्प' हे फीचर समोरच्या व्यक्तीनुसार मेसेजचे सल्ले देईल. तसेच युजर्सना अधिक अचूक आणि योग्य उत्तरांचे पर्याय सुचवेल. हे फीचर वापरताना युजर्सच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

WhatsApp च्या या लेटेस्ट फीचर्सचं रोलआउट सुरू झालं असून येणाऱ्या काही दिवसांत हे फीचर्स जगभरातील सर्व युजर्सपर्यंत पोहोचतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : WhatsApp rolls out multi-account, AI editing, and storage tools!

Web Summary : WhatsApp introduces multiple accounts on iPhone, AI photo editing, enhanced storage management, and easier chat transfers between iOS and Android. The update includes AI writing assistance, ensuring privacy and tailored message suggestions. These features will be available globally soon.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान