युजर्सची मागणी व्हॉट्सअॅपनं ऐकली; दोन-दोन स्मार्टफोन्समध्ये एकाच नंबरचं WhatsApp
By सिद्धेश जाधव | Updated: April 29, 2022 17:13 IST2022-04-29T17:13:26+5:302022-04-29T17:13:35+5:30
WhatsApp Multi-Device फिचरमध्ये नवीन आणि मोठा बदल केला जाणार आहे. गेले कित्येक दिवस याबाबत युजर्सच्या तक्रारी समोर येत होत्या.

युजर्सची मागणी व्हॉट्सअॅपनं ऐकली; दोन-दोन स्मार्टफोन्समध्ये एकाच नंबरचं WhatsApp
WhatsApp सुरु झाल्यापासून एका फिचरची मागणी केली जात होती, ते म्हणजे एकच अकाऊंट दोन डिवाइसमध्ये वापरण्याची. ही मागणी कंपनीनं ने काही दिवसांपूर्वी Android आणि iOS साठी मल्टी डिवाइस सपोर्ट सादर करून पूर्ण केली आहे. परंतु त्यात देखील व्हॉट्सअॅपनं एक महत्वाचं फिचर दिलं नाही, असं युजर्सनं म्हणणं आहे. युजर एक स्मार्टफोनसह आणखी तीन डिवाइसेज लिंक करू शकतात परंतु हे नवीन डिवाइस स्मार्टफोन असू शकत नाहीत. आता मेटा या नवीन फीचरवर काम करत आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या मल्टी डिवाइस फिचरमध्ये नवीन अपडेट घेऊन येत आहे. त्यामुळे आता युजर्स सेकंडरी स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये देखील WhatsApp वापरू शकतील. व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉइड व्हर्जन 2.22.10.13 मध्ये हे फीचर दिसलं आहे. रिपोर्टनुसार आता व्हॉट्सअॅपमध्ये कम्पॅनियन डिवाइस रजिस्टर करण्याचा ‘Register Device as Companion’ असा ऑप्शन मिळेल.
असं वापरता येईल हे फीचर
मल्टी डिवाइस फिचर सर्वांसाठी उपलब्ध झालं असून सुद्धा स्मार्टफोन्स आणि टॅबलेटमध्ये व्हॉट्सअॅपवर नवीन डिवाइस लिंक करण्याचा पर्याय देण्यात आला नाही. परंतु नवीन अपडेट नंतर हे फीचर वापरण्यासाठी युजरला मुख्य डिवाइसमधील अॅपचा QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर डिवाइस लिंक करण्याचा ऑप्शन मिळेल जिथे यात तुम्ही तुमचा कोणताही स्मार्टफोन किंवा टॅबलेट लिंक करू शकाल.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की WhatsApp चं हे फीचर सध्या तरी डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. त्यामुळे Meta आपल्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये हे फीचर कधी घेऊन येईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही.