सावधान! आजपासून कोट्यवधी लोकांचं WhatsApp होणार बंद; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:41 IST2026-03-01T11:41:08+5:302026-03-01T11:41:32+5:30

WhatsApp : आजपासून देशभरातील कोट्यवधी लोकांचं WhatsApp अकाऊंट बंद होणार आहे.

WhatsApp millions affected sim binding rules | सावधान! आजपासून कोट्यवधी लोकांचं WhatsApp होणार बंद; 'हे' आहे कारण

सावधान! आजपासून कोट्यवधी लोकांचं WhatsApp होणार बंद; 'हे' आहे कारण

आजपासून देशभरातील कोट्यवधी लोकांचं WhatsApp अकाऊंट बंद होणार आहे. 'सिम बाइंडिंग' (SIM Binding) हा नवीन नियम यामागचं मुख्य कारण आहे. या नियमासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती, ज्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे या नियमाचा परिणाम टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या इतर मेसेजिंग एप्सवरही होणार आहे.

भारतात कोट्यवधी लोक WhatsApp चा वापर करतात. एका रिपोर्टनुसार, भारतात जवळपास ८५.३ कोटी WhatsApp युजर्स आहेत. यातील अनेक जण 'लिंक्ड डिव्हाइस' फीचरचा वापर करून एकापेक्षा जास्त स्मार्टफोनवर WhatsApp वापरतात. मात्र आता हे बदलणार आहे.

एक्टिव्ह सिम कार्ड असणं अनिवार्य

सिम बाइंडिंग नियम लागू झाल्यानंतर ज्या स्मार्टफोनमध्ये एक्टिव्ह सिम कार्ड नाही, त्या फोनमध्ये WhatsApp चालणार नाही. एकाच सिमच्या मदतीने दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर WhatsApp वापरणाऱ्यांचं अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे. अशा युजर्सची संख्या २ कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे लॅपटॉप आणि पीसीवर WhatsApp Web पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

सिम बाइंडिंगचा नियम

दूरसंचार विभागाने (DoT) 'टेलिकॉम सायबर सुरक्षा (TCS) नियम' अंतर्गत सिम बाइंडिंग अनिवार्य केलं आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी आणि सायबर गुन्हेगारांवर लगाम लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

सिम बाइंडिंग नियमाचे फायदे 

सायबर फसवणुकीला आळा - सायबर गुन्हेगार आता सहजपणे लोकांची फसवणूक करू शकणार नाहीत.

डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये घट - खोट्या ओळखीने केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.

सुरक्षित व्यवहार - UPI एप्समध्ये सिम बाइंडिंग नियम आधीपासूनच लागू आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतात.

काय आहे WhatsApp चं ग्लोबल लॉगिन मॉडेल?

WhatsApp सध्या 'वेरिफाय वन्स' या जागतिक मॉडेलवर काम करतं. यामध्ये एकदा ओटीपीद्वारे व्हेरिफेकेशन झालं की, फोनमध्ये सिम कार्ड नसलं तरीही एप सुरू राहतं. मात्र भारताच्या नवीन सिम बाइंडिंग नियमानंतर WhatsApp ला हे मॉडेल भारतात बदलावं लागणार आहे.

Web Title : सावधान! आज से करोड़ों WhatsApp अकाउंट बंद होने वाले हैं; कारण जानिए

Web Summary : भारत में करोड़ों WhatsApp अकाउंट 'सिम बाइंडिंग' नियम के कारण बंद हो सकते हैं। सक्रिय सिम कार्ड अनिवार्य है; एक सिम से कई डिवाइस पर उपयोग करने वाले खाते प्रभावित होंगे। WhatsApp वेब लैपटॉप और पीसी पर चालू रहेगा।

Web Title : Warning! Millions of WhatsApp accounts to be shut down from today.

Web Summary : Millions of WhatsApp accounts in India may face closure due to the new 'SIM Binding' rule. Active SIM cards are now mandatory; accounts using one SIM across multiple devices could be affected. Laptops and PCs using WhatsApp Web will remain unaffected.