WhatsApp वर सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker, या युजर्ससाठी आले नवीन फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:15 PM2021-11-30T17:15:17+5:302021-11-30T17:16:52+5:30

WhatsApp : लेटेस्ट डेव्हलमेंटमध्ये WhatsApp ने ‘Sticker Maker’ अ‍ॅड केले आहे. ज्यामुळे कोणत्याही फोटोला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते.

whatsapp launched new feature for whatsapp web users can create photos into sticker to send to friends and family | WhatsApp वर सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker, या युजर्ससाठी आले नवीन फीचर

WhatsApp वर सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker, या युजर्ससाठी आले नवीन फीचर

Next

नवी दिल्ली :  व्हॉट्सअ‍ॅपवर ( WhatsApp) सहजपणे चॅट करण्यासाठी आपण मित्र आणि नातेवाईकांना स्टिकर्स पाठवतो. दरम्यान,  WhatsApp कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप वेब प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणले आहे, ज्यावरून पर्सनलाइझ स्टिकर्स तयार केले जाऊ शकतात. 

लेटेस्ट डेव्हलमेंटमध्ये WhatsApp ने ‘Sticker Maker’ अ‍ॅड केले आहे. ज्यामुळे कोणत्याही फोटोला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते. म्हणजेच आता स्टिकर्स बनवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करावा लागणार नाही. 

दरम्यान,  हे नवीन फिचर तुमच्‍या फोटोला कॅरिकेचक (व्यंगचित्र) बनवत नाही, तर ते लो-रिझोल्यूशन स्टिकर बनवते. नवीन स्टिकर्स फिचरमुळे स्टिकर सहजपणे तयार करणे, पाठवणे आणि डाउनलोड करणे शक्य आहे. 

यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्‍हाला स्टिकर बनवण्‍याची इमेज देखील सेव्‍ह करून ठेवावी. तुम्हाला तुमच्या वाढदिवसासाठी वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर बनवायचे असल्यास खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा...

Step 1– सर्व प्रथम WhatsApp वेब ओपन करा आणि कोणत्याही चॅट विंडोवर जा. येथे Attachments वर टॅप करा आणि स्टिकर सिलेक्ट करा.

Step 2- फाइल explorer ओपन होईल. त्यानंतर आता तो फोटो सिलेक्ट करा, जो व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे.

Step 3- तुम्ही फोटोचे corners अ‍ॅडजस्ट करू शकता, फोटो क्रॉप करू शकता, टेक्स्ट व इमोजी अ‍ॅड शकता आणि स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट करू शकता. यानंतर Arrow वर टॅप करून Send करा.

विशेष म्हणजे, हे स्टिकर मेकर फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या Android आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध नाही आणि जे युजर्स सहसा व्हॉट्सअ‍ॅप वेब प्लॅटफॉर्मवरून मेसेज पाठवतात, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

Web Title: whatsapp launched new feature for whatsapp web users can create photos into sticker to send to friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.