सावध व्हा! WhatsApp ठरतंय आजारपणाला कारणीभूत, या वाईट सवयीमुळे लोक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:23 IST2022-02-11T14:22:26+5:302022-02-11T14:23:22+5:30
WhatsApp : तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये त्वरित उत्तर मिळण्याची सवय वाढली आहे. मेसेजला त्वरित रिप्लॉय न मिळाल्याने चिडचिड होणे किंवा चिंता करणे हे सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत.

सावध व्हा! WhatsApp ठरतंय आजारपणाला कारणीभूत, या वाईट सवयीमुळे लोक त्रस्त
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि टेलिग्रामसारख्या (Telegram)अॅप्समुळे लोकांना दिवसभर ऑनलाइन राहण्याची सवय लागली आहे. अशा परिस्थितीत जे लोक 24 तास ऑनलाइन राहतात. त्यांना असे वाटते की, त्यांच्यासारखे दुसरेही 24 तास ऑनलाइन असतील. याचा परिणाम म्हणजे मेसेजला लगेच रिप्लाय न मिळाल्याने लोक नाराज होत आहेत.
कोरोना महामारीनंतर या सवयीला आणखी चालना मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये त्वरित उत्तर मिळण्याची सवय वाढली आहे. मेसेजला त्वरित रिप्लॉय न मिळाल्याने चिडचिड होणे किंवा चिंता करणे हे सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत.
लगेच रिप्लॉय मिळण्याची वाढली अपेक्षा
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडिया लॅबचे संचालक प्रोफेसर जेफ हॅनकॉक म्हणतात की, बहुतेक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्स इन्स्टॉल केलेले असतात. ते त्वरित मेसेजला रिप्लॉय देण्यास सक्षम आहेत. अॅप्सची वाढती संख्या झटपट रिप्लॉय मिळण्याची अपेक्षा वाढवत आहे.
दुसऱ्या व्यक्तीही ऑनलाइन असण्याचा विचार
जे 24 तास ऑनलाइन असतात, ते विचार करू लागतात की समोरची व्यक्ती देखील आपल्यासारखीच ऑनलाइन असेल आणि आपल्या मेसेजकडे दुर्लक्ष करत आहे. पण लोकांच्या आयुष्यात इतरही अनेक गोष्टी असतात हे ते विसरत आहेत.
नात्यातील कटुताही वाढतेय
प्रोफेसर जेफ हॅनकॉक म्हणाले की, स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी भावनिकरित्या जोडले गेलो आहोत. समजा दुसऱ्या देशात बसलेल्या व्यक्तीला कोणी मेसेज केला आणि त्याचे उत्तर मिळाले नाही, तर समोरची व्यक्ती स्वतःहून धक्कादायक गैरसमज काढतो. आपल्या देशात सकाळ असली तरी तिथे रात्र असली पाहिजे हे तो विसरतो. जोडीदाराचा रिप्लाय लगेच आला नाही तर प्रेम कमी झाले आहे असे समजू लागते. त्यामुळे नात्यातील कटुताही वाढत आहे.