तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:28 IST2024-11-28T13:28:32+5:302024-11-28T13:28:32+5:30
WhatsApp : व्हॉट्सॲपवर एकाच वेळी तब्बल २५६ जणांना मेसेज करता येतो. पण यासाठी WhatsApp ची एक छोटी ट्रिक माहीत असणं गरजेचं आहे.

तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
तुम्ही WhatsApp वापरत असाल पण तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फीचर्सबद्दल माहिती आहे का? आपल्या पैकी अनेकांना काही फीचर्स हे माहीत नसतात. व्हॉट्सॲपवर एकाच वेळी तब्बल २५६ जणांना मेसेज करता येतो. पण यासाठी WhatsApp ची एक छोटी ट्रिक माहीत असणं गरजेचं आहे.
युजर्सच्या सोयीसाठी ॲपमध्ये Broadcast Lists फीचर उपलब्ध आहे. या फीचरमुळे तुम्ही ग्रुप न बनवता एकाच वेळी २५६ लोकांना मेसेज पाठवू शकता. नवीन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी, ॲप ओपन करा आणि नंतर उजव्या बाजूला असलेल्या थ्री डॉट्सवर टॅप करा. यानंतर तुम्हाला New Broadcast फीचर दिसेल, या फीचरवर क्लिक करा.
न्यू ब्रॉडकास्टवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला लिस्टमध्ये जोडायचे असलेले कॉन्टॅक्ट्स निवडावे लागतील. लक्षात ठेवा तुम्ही एका लिस्टमध्ये जास्तीत जास्त २५६ कॉन्टॅक्ट्स जोडू शकता. तुम्ही तुमच्या लिस्टला काहीही नाव देऊ शकता. ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केल्यानंतर, तुम्हाला या लिस्टमध्ये फक्त मेसेज पाठवायचा आहे जो तुम्हाला एकाच वेळी सर्वांना पाठवायचा असेल.
हे एक फीचर आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स जोडू शकता ज्यांना तुम्ही एकाच वेळी मेसेज पाठवू इच्छिता. जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज लिस्टमधील प्रत्येकापर्यंत एकाच वेळी पोहोचतो. यामुळे वेळेची बचत होते. एकच मेसेज एकाच वेळी अनेकांना पाठवला जाऊ शकतो.