शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

IPL सीझनसाठी Whatsapp चा स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक, असा करा डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 9:52 AM

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवीन फीचर्स आणत असतं. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे.

ठळक मुद्दे व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो.

नवी दिल्ली - Whatsapp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवीन फीचर्स आणत असतं. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. 

स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो. स्टीकर्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केला जातो. क्रिकेट स्टीकर्स डाऊनलोड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि इमोजी आयकॉनवर क्लिक करा. इमोजीच्या बाजूला असलेल्या प्लस वर क्लिक करा. त्यानंतर क्रिकेट स्टीकर्स येईपर्यंत स्क्रोल करा. त्यानंतर स्टीकर पॅक समोरील डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा म्हणजे तो पॅक डाऊनलोड होईल. याशिवाय प्ले स्टोरवर जाऊन स्टीकर्सवाला थर्ड पार्टी पॅक डाऊनलोड करा. प्ले स्टोरवर 'WAStickerApp' वर उपलब्ध आहे जिथे अनेक स्टीकर पॅक डाऊनलोड करण्याचा पर्याय युजर्सना मिळणार आहे. 

असे करा स्टीकर्स डाऊनलोड 

-  चॅट की- बोर्ड ओपन केल्यावर तुम्हाला एक नवीन स्टीकर बटण दिसेल. 

- स्टीकर बटणावर क्लिक केल्यानंतर नवीन स्टीकर स्टोर ओपन होईल.

- यामध्ये आवडते स्टीकर्स युजरमध्ये चॅटमध्ये वापरता येतील.

- व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी एक डेडिकेटेड स्टिकर कॅटेगरी ठेवली आहे. अ‍ॅपमधील उजव्या बाजूला असलेले + या आयकॉनवर टॅप करा. तुम्हाला 12 स्टीकरचा पॅक उपलब्ध होईल. 

- आपल्या आवडीनुसार स्टीकर डाऊनलोड करू शकता. त्यासाठी प्ले स्टोरमधून आणखी स्टीकर्स डाऊनलोड करावी लागतील. 

- व्हॉट्सअ‍ॅप स्टीकर्सला वेब व्हर्जनवरदेखील वापरता येतील. 

- फेवरेटचा एक पर्यायही या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आवडीचे स्टीकर्स स्टार बटणावर क्लिक करून मार्क करू शकतो.

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपIPLआयपीएलtechnologyतंत्रज्ञान