कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:58 IST2025-10-12T11:57:52+5:302025-10-12T11:58:41+5:30

WhatsApp युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. आता एक खास अपडेट आणत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या WhatsApp प्रोफाइलमध्ये थेट फेसबुक लिंक करता देईल.

WhatsApp bringing special feature facebook link will be visible in profile know what is new update | कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. आता आणखी एक खास अपडेट आणत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या WhatsApp प्रोफाइलमध्ये थेट फेसबुक लिंक करता देईल. या नवीन फीचरमुळे सोशल नेटवर्क कनेक्ट करणं सोपं होईल आणि सोशल कनेक्शनसह प्रोफाइल माहिती शेअर करणं सोपं होईल. मेटाच्या मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp लवकरच एक फीचर सादर करणार आहे जे युजर्सना त्यांचे फेसबुक अकाउंट्स त्यांच्या WhatsApp प्रोफाइलशी थेट लिंक करण्याची परवानगी देईल.

TOI च्या रिपोर्टनुसार, WhatsApp आता या नवीन फीचरद्वारे युजर्सना त्यांच्या फेसबुक प्रोफाइल लिंक्स थेट त्यांच्या WhatsApp अकाउंट्समध्ये जोडण्याचा पर्याय देईल. हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केलं जात आहे. तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये डायरेक्ट लिंक जोडू शकता. लिंक जोडल्यानंतर, ते तुमच्या प्रोफाइलच्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सेक्शनमध्ये दिसेल, ज्यामुळे तुमचे WhatsApp कॉन्टॅक्ट्स फक्त एका टॅपने तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर जाऊ शकतील.

हे फीचर इन्स्टाग्राम लिंक करण्यासारखंच काम करतं. युजर्स त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्जद्वारे फेसबुक लिंक कोण पाहू शकतं हे निवडू शकतील, फक्त त्यांचे कॉन्टॅक्ट असोत की खास लोक असोत. कंपनीने असंही म्हटलं आहे की, हे फीचर डीफॉल्ट असेल आणि उर्वरित WhatsApp वर परिणाम करणार नाही.

युजर्स आपली फेसबुक लिंक अन-व्हेरिफाईड ठेवू शकतात किंवा मेटाच्या अकाउंट्स सेंटरचा वापर करून ती व्हेरिफाय करू शकतात. व्हेरिफिकेशन अंतर्गत दोन्ही अकाऊंट्स एकाच व्यक्तीची आहेत याची खात्री होईल. व्हेरिफायसाठी फेसबुक लिंक असलेल्या WhatsApp प्रोफाइलवर युजर्सच्या नावाजवळ एक लहान फेसबुक आयकॉन दिसेल. अन व्हेरिफाइड लिंक एका क्लिकच्या URL म्हणून दिसेल.

WhatsApp वर हे फीचर आल्यानंतर सुरक्षा आणखी वाढवली जाईल. यामुळे युजर्सना खोटं प्रोफाइल आणि खऱ्या प्रोफाइलमध्ये फरक करणं देखील अधिक सोपं होईल. सध्या या फीचरची बीटामध्ये टेस्टिंग केलं जात आहे आणि अशी आशा आहे की WhatsApp लवकरच ते सर्व युजर्ससाठी हळूहळू रोल आउट करेल.

Web Title : कमाल! WhatsApp का नया फीचर: प्रोफाइल क्लिक करते ही फेसबुक खुलेगा

Web Summary : WhatsApp एक नया फीचर पेश कर रहा है जिससे उपयोगकर्ता सीधे अपने Facebook अकाउंट को अपनी प्रोफाइल से लिंक कर सकेंगे। इससे सोशल नेटवर्क कनेक्शन आसान हो जाएगा। सत्यापित प्रोफाइल पर एक Facebook आइकन दिखाई देगा, जिससे असली खातों की पहचान बढ़ेगी।

Web Title : Amazing! WhatsApp's New Feature: Facebook Opens with Profile Click

Web Summary : WhatsApp is introducing a feature allowing users to link their Facebook accounts directly to their profiles. This facilitates easy social network connections. A Facebook icon will appear on verified profiles, enhancing security by distinguishing genuine accounts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.