काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:34 IST2025-11-12T14:32:19+5:302025-11-12T14:34:35+5:30
अॅपलने एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. हे इलेक्ट्रॉनिक किंवा टेक उत्पादन नाही तर कापडी पॉकेट आहे. कंपनीने त्याची किंमत २०,००० रुपये ठेवली आहे.

काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
अॅपल नेहमी त्यांच्या आयफोन मुळे चर्चेत असते. प्रत्येक वर्षी एक नवीन मॉडेल लाँच करुन वापरकर्त्यांना नवीन फिचर देत असते. या फोनची जगभरात मोठी चर्चा असते. अॅपल महागड्या आणि दमदार उत्पादनांसाठी ओळखले जाते. पण, अॅपलने आता एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. हे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
कंपनीने एकदा १,९०० रुपयांचा क्लिनिंग कापड लाँच केले होते. आयफोन 17 सिरिजसह, कंपनीने क्रॉस-बॉडी आयफोन स्ट्रॅप लाँच केले, याची किंमत देखील सुमारे ६,००० रुपये आहे. आता कंपनीने पॉकेट लाँच केले आहे. याची किंमत २० हजार रुपये आहे.
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
आयफोन पॉकेट ही विणलेली बॅग आहे. यामध्ये तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता. कंपनीने जपानी डिझायनर इस्से मियाके यांच्या सहकार्याने ती तयार केली आहे. त्याची किंमत २२९.९५ अमेरिकन डॉलर्स आहे. ती काळ्या, निळ्या आणि तपकिरी रंगात उपलब्ध आहे. 3D निटेड विणलेली रचना एकाच कापडाच्या तुकड्यापासून बनवली आहे. यामध्ये तुमचा आयफोन आणि इतर लहान वस्तू ठेवू शकता, असे कंपनीने म्हटले आहे.
यामध्ये कोणतेही तंत्रज्ञान नाही. ती एका साध्या बॅगेसारखी आहे. हे लोक पासपोर्ट आणि इतर लहान पण महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी प्रवास करताना घेऊन जातात. त्यात कोणतेही स्मार्ट फीचर्स देखील नाहीत. अॅपलच्या या उत्पादनामुळे सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला आहे. आपल्याकडे हाताने विणून बनवलेल्या बॅगांचीएवढी जास्त किंमत नसते, पण अॅपलने ठेवलेल्या या किंमतीची मोठी चर्चा आहे.