दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:14 IST2025-10-07T16:06:55+5:302025-10-07T16:14:55+5:30
Vivo V60e Price and Specifications: विवो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय व्ही सीरीजमधील नवा स्मार्टफोन Vivo V60e 5G भारतात लॉन्च केला.

दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
विवो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय व्ही सीरीजमधील नवा स्मार्टफोन Vivo V60e 5G भारतात लॉन्च केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा मिड-रेंज बजेट फोन बाजारात आणला असून, यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. एआय फोर सीझन्स पोर्ट्रेट आणि इमेज एक्सपांडर फीचर्स असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
Vivo V60e 5G मध्ये 6.77-इंचाचा क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 nits चा पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. फोनला मीडियाटेक (MediaTek) 7360 टर्बो चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १५-आधारित फनटचओएस १५ वर चालतो. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे.
कॅमेरा
फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फोन खास असेल, कारण यात उच्च रिझोल्यूशनचा कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स देण्यात आली. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगमध्ये यात ५० मेगापिक्सेलचा आय ऑटो-फोकस सेल्फी कॅमेरा आहे.
बॅटरी
Vivo V60e 5G मध्ये मोठी बॅटरी आणि वेगवान चार्जिंग सुविधा आहे. यात 6,500mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही तो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्स आणि अधिकृत रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता.
स्टोरेज आणि किंमत
Vivo V60e च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 29 हजार 999 पासून सुरू होतो. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 31 हजार 999 आहे. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप-टियर मॉडेलची किंमत 33 हजार 999 आहे. हे डिव्हाइस दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर अधिकृत रिटेल स्टोअरमधून खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल.