व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच स्कॅमर्स एक्टिव्ह; तुम्हालाही 'फ्री गिफ्ट', 'आय लव्ह यू'चा मेसेज आलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:56 IST2026-02-11T18:55:29+5:302026-02-11T18:56:49+5:30

प्रेम आणि भेटवस्तूंच्या नावाखाली केलेला एक 'क्लिक' तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं. म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकच्या काळात स्कॅमर्सपासून सावध राहणं गरजेचं आहे.

valentine week scam alert free gift and i love you messages used to trap users online | व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच स्कॅमर्स एक्टिव्ह; तुम्हालाही 'फ्री गिफ्ट', 'आय लव्ह यू'चा मेसेज आलाय?

व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच स्कॅमर्स एक्टिव्ह; तुम्हालाही 'फ्री गिफ्ट', 'आय लव्ह यू'चा मेसेज आलाय?

व्हॅलेंटाईन डे जसा जवळ येत आहे, तशा ऑनलाईन गिफ्ट सर्चिंग, शॉपिंग आणि सोशल मीडियावरील हालचाली वेगाने वाढल्या आहेत. १४ फेब्रुवारीला आपल्या पार्टनरसाठी काहीतरी खास करण्यासाठी लोक गिफ्ट्स, ट्रिप आणि सरप्राईज प्लॅन करत आहेत. मात्र याच संधीचा फायदा घेण्यासाठी सायबर स्कॅमर्सही सज्ज झाले आहेत. प्रेम आणि भेटवस्तूंच्या नावाखाली केलेला एक 'क्लिक' तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं. म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकच्या काळात स्कॅमर्सपासून सावध राहणं गरजेचं आहे.

'रोमान्स स्कॅम'पासून अलर्ट

व्हॅलेंटाईन वीक दरम्यान 'रोमान्स स्कॅम'चं प्रमाण सर्वाधिक असतं. हे स्कॅम प्रामुख्याने डेटिंग एप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरू होतात. स्कॅमर्स बनावट प्रोफाईल बनवून आधी सामान्य संवाद साधतात आणि हळूहळू भावनिक बोलणं किंवा 'आय लव्ह यू' सारखे मेसेज पाठवतात. एकदा विश्वास संपादन केला की, मेडिकल इमर्जन्सी, नोकरीतील अडचण किंवा तुम्हाला भेटायला येण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली जाते. अनेक प्रकरणांत पैसे मिळताच समोरची व्यक्ती गायब होते.

फ्री गिफ्ट आणि डिलिव्हरीचे मेसेज

या काळात अनेकांना अचानक मेसेज किंवा कॉल येतो की तुमच्यासाठी 'सरप्राईज गिफ्ट' किंवा 'फ्लॉवर डिलिव्हरी' आली आहे. यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास किंवा ओटीपी (OTP) शेअर करण्यास सांगितलं जातं. असं करताच स्कॅमर्स तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचतात. खात्री केल्याशिवाय अशा मेसेजवर विश्वास ठेवणं महागात पडू शकतं.

गिवअवे स्कॅम 

सोशल मीडियावर फ्री डिनर, हॉलिडे पॅकेज किंवा महागड्या भेटवस्तू जिंकल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. या पोस्टमधील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरण्यास आणि 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली छोटी रक्कम जमा करण्यास सांगितलं जातं. प्रत्यक्षात या लिंक्स बनावट असतात, ज्याद्वारे तुमचा डेटा आणि पैसे दोन्ही चोरले जातात.

बनावट ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सचं जाळं

व्हॅलेंटाईन डेला शॉपिंगची क्रेझ वाढते. याचा फायदा घेत स्कॅमर्स हुबेहूब खऱ्या वेबसाइट्ससारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार करतात. यावर भरघोस डिस्काउंट आणि स्वस्त दरांचे आमिष दाखवलं जातं एखादा युजर्स जेव्हा तिथे आपली पर्सनल किंवा बँक याची माहिती भरतो, तेव्हा त्याची पर्सनल माहिती चोरीला जाते.

ओळखीच्या व्यक्तीच्या नावाखाली फसवणूक

काही प्रकरणांत स्कॅमर्स फोन करून दावा करतात की, तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने तुमच्यासाठी मेसेज किंवा गिफ्ट पाठवलं आहे. ते नाव, फोटो किंवा इतर माहिती दाखवून विश्वास संपादन करतात आणि तातडीने ओटीपी मागतात. 

स्वतःला सुरक्षित कसं ठेवाल?

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

ओटीपी, बँक डिटेल्स किंवा पर्सनल माहिती कोणाशीही शेअर करू नका.

अतिशय स्वस्त ऑफर्स आणि फ्री गिफ्ट्सच्या आमिषाला बळी पडू नका.

नवीन किंवा अनोळखी वेबसाइटवरून शॉपिंग करण्यापूर्वी तिची विश्वासार्हता तपासा.
 

Web Title : वैलेंटाइन वीक: स्कैमर्स सक्रिय; मुफ्त उपहार, 'आई लव यू' संदेशों से सावधान!

Web Summary : वैलेंटाइन डे के नजदीक आते ही ऑनलाइन घोटाले बढ़ जाते हैं। साइबर अपराधी नकली उपहार, रोमांस और शॉपिंग सौदों का उपयोग करके पैसे और डेटा चुराते हैं। धोखाधड़ी से बचने के लिए अवांछित लिंक, ओटीपी अनुरोधों और अविश्वसनीय प्रस्तावों से सावधान रहें।

Web Title : Valentine's Week: Scammers Active; Beware of Free Gifts, 'I Love You' Messages!

Web Summary : As Valentine's Day approaches, online scams surge. Cybercriminals use fake gifts, romance, and shopping deals to steal money and data. Stay alert for unsolicited links, OTP requests, and too-good-to-be-true offers to protect yourself from fraud.