खरेदी करण्यापूर्वी फोन वापरा, मगच...! स्वदेशी कंपनीने आणली ऑफर, स्मार्टफोन बाजारात आग लागणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:41 IST2025-11-18T17:41:05+5:302025-11-18T17:41:22+5:30
लाँचिंगपूर्वीच कंपनीने एक जबरदस्त आणि अनोखी ऑफर आणली आहे. ग्राहकांना फोन खरेदी करण्यापूर्वी तो घरी वापरून पाहता येणार आहे.

खरेदी करण्यापूर्वी फोन वापरा, मगच...! स्वदेशी कंपनीने आणली ऑफर, स्मार्टफोन बाजारात आग लागणार...
भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Lava Agni 4 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. हा ५जी हँडसेट २० नोव्हेंबरला बाजारात दाखल होत आहे. मात्र, लाँचिंगपूर्वीच कंपनीने एक जबरदस्त आणि अनोखी ऑफर आणली आहे. ग्राहकांना फोन खरेदी करण्यापूर्वी तो घरी वापरून पाहता येणार आहे.
लावाने या खास मोहिमेला 'Demo@Home' असे नाव दिले आहे. याअंतर्गत मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरु येथील ग्राहक नोंदणी करून फोन घरी मागवू शकतील आणि खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी Agni 4 चा डिझाइन आणि फीचर्स तपासू शकतील.
फीचर्स आणि अपेक्षित किंमत
Lava Agni 4 मध्ये प्रीमियम सेगमेंटमधील अनेक वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. यात MediaTek चा पॉवरफुल Dimensity 8350 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो वेगवान ५जी कनेक्टिव्हिटी आणि उत्कृष्ट गेमिंग अनुभव देईल. फोनमध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सह येणार आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत कंपनीने मोठा अपग्रेड केला आहे. यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
हँडसेटमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच जलद LPDDR5X रॅम, UFS 4.0 स्टोरेज आणि 'नो-ब्लोटवेअर'चा अनुभव मिळेल. Lava Agni 4 ची किंमत ₹25,000 ते ₹30,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.