शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अलर्ट! चीनचा व्हायरस अटॅक, 15 लाख भारतीयांचा डेटा चोरीला; व्हा सावध, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:55 IST

गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत.

भारतात सायबर गुन्हेगार वेगाने आपले हात-पाय पसरत आहेत. दररोज नवीन मालवेअर किंवा स्पायवेअर सुरक्षेत अडथळा आणत आहेत. गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत. ज्या Apps मध्ये हे स्पायवेअर आहेत ते युजर्सना व्हायरसने प्रभावित झाल्याचं कळू देत नाहीत. हे दोन Apps File Recovery and Data Recoveryआणि File Manager आहेत आणि त्यांचे एकत्रितपणे 15 लाख युजर्स आहेत.

Pradeo नावाच्या मोबाईल सायबर सिक्योरिटी कंपनीने खुलासा केला आहे की, Google Play Store वर असे दोन Apps आहेत जे स्वतःला फाइल मॅनेजमेंट टूल्स म्हणून दाखवतात. पण युजर्सचा संवेदनशील डेटा चोरून तो चीनला पाठवला जात आहे. हे App लाखो लोकांनी डाऊनलोड केलं आहे आणि युजर्स देखील त्यांचा वापर करत आहेत.

File Recovery and Data Recovery युजर्सचा डेटा चोरत आहेत. त्यांचे अनुक्रमे 10 लाखांहून अधिक युजर्स आणि 5 लाख डाउनलोड आहेत. तसेच हे Apps दावा करतात की, ते कोणत्याही प्रकारचा डेटा चोरत नाहीत. Pradeo च्या अहवालानुसार, हे Apps युजर्सचा वैयक्तिक डेटा जसे की रिअल टाइम तपशील, सोशल नेटवर्क्स, ईमेल, संपर्क इत्यादी चोरतात. हे Apps हा डेटा चिनी सर्व्हरला पाठवत आहेत.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

- कोणत्याही थर्ड पार्टी App वरून कोणतेही App डाउनलोड करू नका.- कोणतेही App डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचा रिव्ह्यू वाचा. - तुम्हाला काही चुकीचे आढळल्यास ते App डाउनलोड करू नका.- जर एखाद्या App ने तुम्हाला परवानगी मागितली तर तुम्ही फक्त त्याच परवानग्या द्याव्या ज्या आवश्यक आहेत.- तुमच्या डिव्हाइसवर नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असावे.- फोनमध्ये येणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर अपडेट्ससह फोन अपडेट ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान